Crime News : लक्झरी बस आणि कारचा भीषण अपघात, भयानक आवाजामुळं गाव घटनास्थळी पोहोचलं

Bus car accident : लक्झरी बस आणि कारची समोरासमोर जोराची धडक झाली. त्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी आहेत.

Crime News : लक्झरी बस आणि कारचा भीषण अपघात, भयानक आवाजामुळं गाव घटनास्थळी पोहोचलं
bus car accident
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 16, 2023 | 11:52 AM

गणेश सोळंकी, बुलढाणा : बुलढाणा (Buldhana) शहरापासून काही अंतरावर येळगाव (Yelgaon) या गावजवळ असलेल्या टोल नाक्याच्या पुढे पैनगंगा नदीवरील पुलावर लक्झरी बस आणि कार यांच्यामध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. ही घटना रात्री 9 ते 10 च्या दरम्यान झाली असून या अपघातात कारमधील एक जण घटनास्थळीच ठार झाला तर इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी (Bus car accident) घटनास्थळी पोहचून गाड्या बाजूला केल्याची माहिती मिळाली आहे. त्याबरोबर चुकी कोणाची आहे याचा पोलिस शोध घेत आहेत. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी इतका भयानक आवाज झाला की, लोकं घटनास्थळी दाखल झाली.

संगीतम ही खासगी लक्झरी बस बुलढाण्याहून पुण्यासाठी जाण्याकरीता निघाली होती. तर भरधाव कार चिखलीकडून बुलढाण्याकडे येत होती. अपघात एवढा भीषण आहे की कार चक्काचूर झाली आहे. दरम्यान रुग्णवाहिकेतून तिन्ही जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले आहे. यामधील मिलिंद पवार असे मृतकाचे नाव असून चौघेजण सव या गावातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे..

मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. इतर तीनजण गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. जखमी झालेल्यांची पोलिसांनी चौकशी केली असून लक्झरी बसमधील लोकांची सुध्दा चौकशी करण्यात येणार आहे.

रात्रीच्या वेळेस अशा पद्धतीचे अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे लोकं रात्री प्रवास करीत नाहीत. प्रवास करायचा झाल्यास रात्री खूप काळजी घेतात.