PUNE शिवाजीनगर न्यायालयाबाहेरील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील फरार आरोपी अखेर जेरबंद!

पुणे न्यायालयाबाहेर झालेल्या हल्ल्या प्रकरणात यवत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील फरार आरोपीला बेड्या घालण्यात पोलिसांना यश आले आहे.

PUNE शिवाजीनगर न्यायालयाबाहेरील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील फरार आरोपी अखेर जेरबंद!
pune court firing case
| Updated on: Nov 26, 2026 | 7:04 PM

रवींद्र देसाई, टीव्ही ९ मराठी, प्रतिनिधी : – पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर भरदिवसा गोळीबार करून कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याच्या प्रकरणाने राज्यात राजकारण तापले आहे. या हल्ल्यामुळे पुण्याची ढासळती कायदा आणि सुव्यवस्था चर्चेत आली असताना या प्रकरणात काल पोलिसांनी तिघा आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले होते. मात्र, एक आरोपी पसार झाला होता. या आरोपीच्या शोधासाठी दौंड परिसरात रात्री गस्तीपथकाने शोध मोहिम सुरु केली होती. या शोध मोहिमेला यश आले असून या आरोपीला अखेर दौंड तालुक्यातील कडेठाण येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

फरार आरोपीला अखेर बेड्या

प्रथमेश दीपक येणपुरे, वय १९ वर्षे, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे शहरातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर आरोपीने गोळीबार करून कोयत्याने वार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. दरम्यान, यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दौंड तालुक्यातील कडेठाण गावात आरोपी लपून बसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार यवत पोलिसांच्या पथकाने गावात जाऊन स्थानिक पोलीस पाटील आणि ग्रामस्थांच्या मदतीने सापळा रचत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले.

Loading...

या आरोपीच्या अंगझडतीमध्ये गावठी पिस्तुलासाठी वापरण्यात येणारी एक लोखंडी रिकामी मॅगझीन जप्त करण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला पुणे शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलिसांनी केली आहे.

पुणे येथील शिवाजीनगर कोर्टाबाहेर मंदार किवळे याच्यावर भर दिवसा गोळीबार आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला करून आरोपी पसार झाले होती. हे  हल्लेखोर दौंडच्या दिशेने पसार झाले. पुणे पोलिसांनी त्यांचा माग काढला. त्यातील दोन आरोपींच्या मुसक्या आळवल्या. पण एका आरोपीने पोलिसांना गुंगारा देत पळ काढला होता. त्याच्या शोधासाठी दौंड तालुक्यातील बेटवाडीमध्ये रात्रीच्या काळोखात पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केले होते. अखेर यवत पोलिसांनी या फरार आरोपीला दौंड तालुक्यातील कडेठाण येथून अटक आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us