UP News: मुलीच्या खोलीतून मध्यरात्री आवाज, कुटुंबीय चक्रावले, डोकावून पाहताच जे दिसलं…
एका गावातील तरुणाचे अझीमनगर भागातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. बऱ्याच काळापासून दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल होते, सोबत राहण्याच्या शपथा खाल्ल्या होत्या. अशातच मंगळवारी रात्री प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटायला तिच्या घरी गेला.

UP News: प्रेमात सगळं माफ असते असे म्हणतात, पण प्रेमात तेव्हचं सगळं माफ असते जेव्हा पालकांना ते मान्य असते. अन्यथा चोरी चोरी चुपके चुपके भेटताना अनेकदा पालकांना सापडतात अन् चांगलीच फजिती होते. अशीच घटना उत्तरप्रदेशमधून समोर आली आहे. उत्तरप्रदेशच्या रामपुरमध्ये प्रेयसीला भेटायला गेलेला प्रियकर तिच्या कुटुंबियांना रंगेहाथ सापडला, त्यानंतर तिच्या घरच्यांनी असा काही निर्णय घेतला की त्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. नेमकं काय घडलं? वाचा….
प्रेयसीला मध्यरात्री भेटायला गेला अन् सापडला…
याबाबत सविस्तर वृत्त असे की, ही घटना अझीमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खौद चौकी भागातील एका गावात घडली. सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील तरुणाचे अझीमनगर भागातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. बऱ्याच काळापासून दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल होते, सोबत राहण्याच्या शपथा खाल्ल्या होत्या. अशातच मंगळवारी रात्री प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटायला तिच्या घरी गेला.
रात्री प्रेयसीच्या घरी गेल्यानंतर त्याने प्रेयसीला फोन करुन उठवले. ते दोघे घरातील एका खोलीत गेले. प्रियकर आणि प्रेयसी एका बंद खोलीत भेटत होते,अशातच घरातील इतर सदस्यांना घरात कोणीतरी आले आहे का? अशी शंका आली. ते जागे झाले, दिवे लावून आजुबाजूला पाहिले. जेव्हा कुटुंबातील सदस्य खोलीत शिरले तेव्हा मुलीसोबत तिचा प्रियकर आक्षेापार्ह अवस्थेत सापडले. त्यांना अशा अवस्थेत पाहून कुटुंबातील सदस्य संतापले, ज्यामुळे गोंधळ उडाला.
तरुण- तरुणीचे लावून दिले लग्न…!
हा सगळा गोंधळ ऐकून परिसरातील अनेक लोक घटनास्थळी आले आणि त्यांनी आरोपी तरुण प्रियकराला पकडले. त्याला पकडल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी त्याला खोलीत कोंडून ठेवले. यादरम्यान त्या प्रियकरालाही मारहाण करण्यात आली. लोकांनी आपला राग त्या प्रियकरावर काढला.
मुलाला पकडल्याचे समजताच त्याचे कुटुंबीय काही प्रतिष्ठित लोकांसह घटनास्थळी पोहोचले. दोन्ही पक्षांमध्ये पंचायत झाली. १२ तासांच्या पंचायतीनंतर, दोन्ही पक्षांमध्ये तडजोड झाली आणि दोघांचे लग्न लावून देण्याचा निर्णय झाला . करारानुसार, प्रेमी युगल मंदिरात गेले, त्यांनी विधीपूर्वक वचने घेतली आणि एकमेकांना हार घातला. लग्नानंतर, प्रियकराने आपल्या प्रेयसीला घरी सोडले
