बंगल्यात सापडला अभिनेत्रीचा मृतदेह, बॉलीवूडच्या या सुंदर नायिकेच्या चहात कोणी मिसळले ‘विष’?

| Updated on: Mar 11, 2023 | 11:06 PM

बॉलिवूडची ही सुंदर अभिनेत्री अशा प्रकारे जग सोडून जाईल असं कधी कोणाला वाटलं ही नव्हतं. तिचा खून कोणी केला? कसा झाला उलगडा? वाचा

बंगल्यात सापडला अभिनेत्रीचा मृतदेह, बॉलीवूडच्या या सुंदर नायिकेच्या चहात कोणी मिसळले विष?
Follow us on

मुंबई : भारतात सेलिब्रिटींची जेवढी चर्चा होती तेवढी चर्चा कदाचितच इतर कोणाची होत असेल. बॉलिवूडचे कलाकार नेहमीच लोकांसाठी चर्चेचा विषय ठरले आहेत. कलाकारांचे चाहते ही तसेच.आपल्या आवडत्या सेलिब्रिटीसाठी ते काहीही करायला तयार असतात. पण बॉलिवूडच्या या जगात असे अनेक कलाकार आहेत ज्यांचा मृत्यू अजूनही रहस्य राहिलेले आहे. त्यांचा मृत्यूचं कारण अजूनही पुढे येऊ शकलेलं नाही. अशीच एक बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री म्हणजे प्रिया राजवंश. जिची मुंबईत हत्या करण्यात आली होती.

बॉलीवूडच्या अनेक सिनेमांमध्ये काम केल्यानंतर अभिनेत्रीने आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. पण पुढे तिची जुहूच्या बंगल्यात हत्या झाली. 2000 साली जुहू येथे गूढ परिस्थितीत तिचा मृतदेह आढळला होता. जिने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले ती अभिनेत्री अशी अचानक निघून जाईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. चहामध्ये झोपेच्या गोळ्या टाकून तिची हत्या झाली होती. गळा दाबून तिचा खून झाला. 27 मार्च 2000 रोजी सकाळी प्रियाच्या कुटुंबीयांना तिचा मृतदेह आढळला. या बातमीने बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली होती. पण तिचा मारेकरी कोण हा प्रश्न होता.

प्रिया राजवंश ही मुळची शिमलाची राहणारी होती. श्रीमंत कुटुंबात तिचा जन्म झाला होता. पण अभिनयाची आवड असल्याने ती मुंबईत आली. बॉलिवूडमधून तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या. चेतन आनंद यांच्या हकीकत चित्रपटात काम करण्यासाठी ती मुंबईला आली.

शूटिंगदरम्यान प्रिया आणि दिग्दर्शक चेतन आनंद यांची चांगली बॉन्डिंग जमली. त्यांचा हीर-रांझा हा चित्रपट खूप गाजला. चेतन आनंद प्रियापेक्षा 15 वर्षांनी मोठा होता. तो आधीच विवाहित होता आणि त्याला दोन मुले देखील होती. पण पत्नीसोबत फारसे चांगले संबंध नसल्याने तो नंतर प्रिया सोबत मुंबईत एकत्र राहू लागला.

चेतन आनंद यांचे १९९७ मध्ये निधन झाले. अनेक वर्षे त्यांचे प्रेमप्रकरण असेच चालू होते. हळूहळू सगळ्यांनी हे नातं स्वीकारलं, अगदी चेतन आनंदच्या मुलांसोबतही प्रियाचे संबंध चांगले होते. चेतन आनंद शेवटच्या क्षणापर्यंत प्रियाच्या सोबत राहिला. 1997 मध्ये त्यांचे निधन झाले आणि त्यानंतर प्रिया चेतनच्या जुहूच्या बंगल्यात तिच्या सावत्र मुलांसोबत राहायला गेली.

चेतनच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी प्रियाच्या हत्येची बातमी आली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा घरातील नोकराने प्रियाच्या चहामध्ये झोपेच्या गोळ्या मिसळल्याचं समोर आलं, पण का असा प्रश्न उपस्थित झाला. पोलिसांनी नोकराला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असता या खुनाच्या गूढाचे वास्तव समोर आले.

प्रियाचा खुनी कोण होता?

प्रिया सचदेवची हत्या तिच्याच सावत्र मुलांनी केली होती. सावत्र मुलांनी नोकराला आईला मारण्याची सुपारी दिली होती. चेतन आनंदने आपल्या मालमत्तेचा काही भाग प्रियाला दिल्याने केतन आनंद आणि विवेक आनंद नाराज होते. प्रियाचा ज्यांना आपल्या मुलांसारखं जपायची त्यांनीच तिचा घात केला. अभिनेत्रीच्या हत्येप्रकरणी केतन आनंद, विवेक आनंद आणि त्यांचे दोन नोकर माला चौधरी आणि अशोक चिन्नास्वामी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.