AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rotweiler Dog : रॉटविलर कुत्रा कोणाचाच नसतो, चार महिन्याच्या मुलीसोबत जे केलं, ते ऐकून थरकाप उडेल

Rotweiler Dog : कुत्र्याच्या हल्ल्याने मुलांचा एकच आरडा-ओरडा सुरु झाला. त्याचवेळी या रॉटविलरने एका लहान मुलीवर झेप घेतली. तिला वाचवण्यासाठी मावशी धावली. पण कुत्र्याने तिच्यावर सुद्धा हल्ला केला.

Rotweiler Dog :  रॉटविलर कुत्रा कोणाचाच नसतो, चार महिन्याच्या मुलीसोबत जे केलं, ते ऐकून थरकाप उडेल
rotweiler dog
| Updated on: May 14, 2025 | 4:15 PM
Share

एका पाळीव रॉटविलर कुत्र्याने चार महिन्याच्या मुलीवर हल्ला केला. हा कुत्रा इतका आक्रमक झाला की, त्याने चार महिन्याच्या मुलीला ओरबाडून-ओरबाडून मारलं. रॉटविलर कुत्र्याच्या हल्ल्यात या मुलीसोबत असलेली मावशी देखील जखमी झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या घटनेने मृत मुलीच्या कुटुंबात सगळेच हादरुन गेलेत. गुजरातच्या अहमदाबाद भागातील हाथीजन भागात ही भयानक घटना घडली.

पोलिसांनी कुत्र्याच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अहमदाबाद नगर पालिकेच्या सीएनसीडी विभागाच्या टीमने या डेंजर कुत्र्याला पिंजऱ्यात बंद केला आहे. हाथीजन भागातील राधे रेसीडन्सीमधील एका पाळीव कुत्र्याने चार महिन्याच्या मुलीवर हल्ला केला. एक युवती पाळलेल्या रॉटविलर कुत्र्याला घेऊन बाहेर आली होती. युवती कोणाबरोबर तरी फोनवर बोलण्यात व्यस्त होती. तेवढ्याता हा कुत्रा निसटला. त्याने समोर खेळत असलेल्या मुलांवर हल्ला केला.

डेंजर कुत्रा पिंजऱ्यात बंद

कुत्र्याच्या हल्ल्याने मुलांचा एकच आरडा-ओरडा सुरु झाला. त्याचवेळी या रॉटविलरने एका लहान मुलीवर झेप घेतली. तिला वाचवण्यासाठी मावशी धावली. पण कुत्र्याने तिच्यावर सुद्धा हल्ला केला. रॉटविलरच्या हल्ल्यात मुलगी गंभीररित्या जखमी झाली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेने लोक दहशतीखाली आहेत. अहमदाबाद नगर पालिकेच्या सीएनसीडी विभागाच्या टीमने या डेंजर कुत्र्याला पिंजऱ्यात बंद केलं आहे. कुत्र्याच्या मालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

आक्रमक ब्रीडचे कुत्रे कुठले?

रॉटविलर, पिटबुल, पोमेरेनियन, जर्मन शेफर्ड आणि डॉबरमॅन हे आक्रामक ब्रीडचे कुत्रे आहेत. हे कुत्रे पाळताना खूप काळजी घ्यावी लागते. या आक्रमक कुत्र्यांना उच्च प्रशिक्षण गरजेच आहे. त्याशिवाय ते जास्त आक्रमक असतील तर त्यांना डॉक्टरकडे नेलं पाहिजे असं जनावरांच्या डॉक्टरने सांगितलं. जे पहिल्यांदा कुत्रा पाळतायत त्यांनी आक्रमक कुत्रा आणू नये.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.