Nashik : वऱ्हाडासोबत आलेली तरूणी गायब झाल्याने खळबळ, मुलीच्या वडिलांची नाशिक पोलीस अधिक्षकांकडे तक्रार

| Updated on: Jun 03, 2022 | 1:59 PM

Nashik Police : लग्न संपल्यावर संजना सुरनर अचानक गायब झाली. त्यानंतर संजनाच्या वडीलांनी तिचा शोध घेतला. परंतु ती कुठेही आढळून आली नाही. अनेक दिवस शोध घेतल्यांनतर देखील मुलीचा सुगावा कुठेचं लागत नसल्याने तिच्या वडिलांनी थेट पोलिस स्टेशन गाठले आहे.

Nashik : वऱ्हाडासोबत आलेली तरूणी गायब झाल्याने खळबळ,  मुलीच्या वडिलांची नाशिक पोलीस अधिक्षकांकडे तक्रार
वऱ्हाडासोबत आलेली तरूणी गायब झाल्याने खळबळ
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नाशिक : मुली त्यांच्या प्रियकरासोबत पळून गेल्याच्या घटना रोज घडत असतात. पण अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील घाटघर (Ghatghar) येथील तरूणी एका लग्नासाठी आली होती. ही तरूणी नाशिकच्या इगतपुरी (Igatpuri) येथे वऱ्हाडासोबत आली होती. लग्न लागल्यानंतर मुलगी अचानक गायब झाल्याने लग्न मंडपात खळबळ माजली होती. इगतपुरी तालुक्यातील वाळविहीर येथे ही घटना घडली असून याबाबत तरुणीच्या वडीलांनी घोटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

मैत्रीणीचं लग्न लागताचं मुलगी गायब

याबाबत अधिक माहिती अशी की, घाटघर येथील राजू चिमा सुरनर यांची मुलगी संजना राजु सुरनर वय 18 वर्ष वाळविहीर येथील नातेवाईकांच्या लग्नाला 21 मे रोजी वऱ्हाडाच्या गाडीत मैत्रिणी बरोबर आली होती. मात्र लग्न संपल्यावर संजना सुरनर अचानक गायब झाली. त्यानंतर संजनाच्या वडीलांनी तिचा शोध घेतला. परंतु ती कुठेही आढळून आली नाही. अनेक दिवस शोध घेतल्यांनतर देखील मुलीचा सुगावा कुठेचं लागत नसल्याने तिच्या वडिलांनी थेट पोलिस स्टेशन गाठले आहे. तिच्या वडिलांचे नाव राजु सुरनर असं असून त्यांनी 24 मे रोजी घोटी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे.

नाशिक ग्रामिण पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्याकडे तक्रार

या तक्रारीची घोटी पोलीसांनी दखल न घेतल्यामुळे राजू सुरनर यांनी याबाबत नाशिक ग्रामिण पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्याकडे तक्रार दिली आहे. या तक्रारीत म्हटले मुलीच्या वडिलांनी म्हटले आहे की, माझी मुलगी ज्या मैत्रिणी सोबत लग्नाला गेली. त्या मैत्रिणीच्या ओळखीचे इसम मोहित सिताराम हुलगुंडे, कुशी गणपत गुडनर, पिंटी गणपत गुडनर रा. नांदगाव, तालुका जव्हार यांनी माझ्या मुलीला लग्नाच्या वऱ्हाडामधून फसवून नेलेले आहे.

हे सुद्धा वाचा

सदर मोहित हुलगंडे व इतरांची चौकशी करून माझी मुलगी संजना सुरनर हिचा शोध घेऊन सदर इसमांवर योग्य ती कारवाई करावी अशी तक्रार दाखल झाली आहे.