Indigo flight | उशिर झाला म्हणून पायलटला पंच मारणारा साहिल ‘या’ ठिकाणी निघालेला हनिमूनला

| Updated on: Jan 16, 2024 | 11:09 AM

Indigo flight | विमानात एका प्रवाशाने पायलटला ठोसा लगावला. या घटनेची देशात चर्चा सुरु आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात ही घटना घडली. आरोपी पत्नीसोबत हनिमूनला निघाला होता. त्यावेळी ही घटना घडली. इंडिगोच्या विमानात हाणामारीचा प्रसंग का उदभवला? नेमक त्यावेळी काय घडलं?

Indigo flight | उशिर झाला म्हणून पायलटला पंच मारणारा साहिल या ठिकाणी निघालेला हनिमूनला
air passenger attack on indigo flight co pilot
Follow us on

नवी दिल्ली : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यात एक व्यक्ती विमानाचा सह पायलट अनूप कुमारवर हल्ला करताना दिसतोय. खराब हवामानामुळे उड्डाणाला विलंब होणार अशी वैमानिक घोषणा करत होता, त्यावेळी ही घटना घडली. या प्रकारानंतर सीआयएसएफने आरोपीला अटक करुन दिल्ली पोलिसांकडे सोपवलं. सोमवारी संध्याकाळी आरोपी साहिल कटारियाला जामीन मंजूर करण्यात आला.

दिल्ली पोलिसांनी साहिल विरोधात आयपीसीच्या कलम 323, 341 आणि कलम 290 अंतर्गत गुन्हा नोंदवलाय. अधिकाऱ्यांनी आरोपी साहिल कटारियाची सुटका केली. कारण जामीन मिळू शकणारी कलम लावण्यात आली होती. प्रकणाचा पुढील तपास सुरु आहे.

हनिमूनसाठी कुठे चाललेला?

साहिल कटारिया पत्नीसोबत हनिमूनसाठी गोव्याला चालला होता. दाट धुक्यामुळे उड्डाणाला 13 तास विलंब झाला. त्यामुळे साहिलने इंडिगो एअरलाइन्सच्या पायलटला पंच मारला. 35 वर्षाच्या साहिल कटारियाच दक्षिण दिल्ली अमर कॉलनीमध्ये एक स्टेशनरी आणि खेळण्याचा दुकान आहे. तो आपल्या कुटुंबासोबत ईस्ट ऑफ कैलाश येथे राहतो. घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर कटारियाला अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी आता जामिनावर त्याची सुटका केली.

सीआयएसएफने त्याला विमानातून उतरवलं

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्याच नुकतच लग्न झालं होतं. रविवारी तो पत्नीसोबत सुट्टीवर निघाला होता. मारहाणीच्या या घटनेनंतर दिल्ली विमानतळावरच सीआयएसएफने त्याला विमानातून उतरवलं.

माफी मागितली

विलंब आणि केबिन क्रू च्या बेजबाबदार वर्तनामुळे साहिला निराश होता. त्याचा स्वत:वरील संयम सुटला व त्याने वैमानिकावर हल्ला केला. दुसऱ्या व्हिडिओमध्ये कटारिया माफी मागताना दिसतोय. मारहाणीच्या घटनेनंतर त्याने आणि त्याच्या पत्नीने कर्मचारी आणि पोलिसांची माफी मागितली. हे प्रकरण कोर्टात जाणार. सह-वैमानिकाच्या तक्रारीवरुन एफआयआर नोंदवण्यात आला आहे.