बॉक्सिंगची रिंग गाजवली, पण घरच्या संघर्षात हरला; वाचा स्टार बॉक्सरसोबत नेमके काय घडले ?

जोन्सच्या निधनानंतर बॉक्सिंग जगावर शोककळा पसरली आहे. दिग्गज आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर जोन्सच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे.

बॉक्सिंगची रिंग गाजवली, पण घरच्या संघर्षात हरला; वाचा स्टार बॉक्सरसोबत नेमके काय घडले ?
बॉक्सिंगची रिंग गाजवली, पण घरच्या संघर्षात हरला
Image Credit source: Aaj Tak
| Updated on: Sep 22, 2022 | 11:42 PM

बॉक्सिंगच्या रिंगमध्ये शत्रूला धूळ चारणारा अमेरिकेचा स्टार बॉक्सर इसिया जोन्स (Isiah Jones) घरच्या रिंगणात मात्र कायमचा हरला आहे. कौटुंबिक वादातून स्टार बॉक्सर (Star Boxer)ला त्याच्या भावानेच संपवल्या (Killed)ची धक्कादायक घटना घडली आहे. अमेरिकेचा स्टार बॉक्सर इसिया जोन्सनेही रिंगमध्ये शत्रूला धूळ चारली आहे. मोठमोठे बॉक्सरही जोन्ससमोर आल्यावर थरथर कापायचे. पण रिंगमध्ये शत्रूंना पराभूत करणारा 28 वर्षीय बॉक्सर आपल्याच घरात पराभूत झाला आहे.

कौटुंबिक वादातून जोन्सची भावाकडून हत्या

कौटुंबिक वादातून इसिया जोन्सला त्याच्याच भावाने सोमवारी संध्याकाळी गोळ्या घातल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. तपासात मयत तरुण हा टॉप स्टार बॉक्सर इसिया जोन्स असल्याचे पोलिसांना कळाले.

बॉक्सिंग जगतावर शोककळा

या हत्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जोन्सच्या निधनानंतर बॉक्सिंग जगावर शोककळा पसरली आहे. दिग्गज आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर जोन्सच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे.

जोन्सच्या चाहत्यांना मोठा धक्का

28 वर्षीय जोन्स हा स्टार बॉक्सर होता. त्याच्या पुढे दीर्घ कारकीर्द होती. एवढ्या लहान वयात जगाचा निरोप घेणे हे बॉक्सिंग जगताचे मोठे नुकसान आहे. जोन्सच्या निधनाने चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

जुलैमध्ये खेळला होता शेवटचा सामना

इसिया जोन्सने 2016 राष्ट्रीय गोल्डन ग्लोव्हज जिंकले. यानंतरही त्याने रोशॉन आणि केनेथ रॉस यांच्या मार्गदर्शनाखाली पहिले आठ व्यावसायिक सामने जिंकले. यादरम्यान तो त्याच्या सर्वोच्च टप्प्यात होता, परंतु त्यानंतर त्याचा परफॉर्मन्स काहीसा ढासळला. त्याने अनेक सामने गमावले होते. जोन्सने शेवटचा सामना अँड्र्यू मर्फीविरुद्ध जुलैमध्ये खेळला.