नितीन गिलबिले हत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, अखेर मुख्य आरोपी…

नितीन गिलबिले हत्याकांडाच्या तपासाला मोठे यश आले आहे. या धक्कादायक हत्याकांडातील प्रमुख आरोपीला बेड्या घालण्यात पोलिसांना यश आले आहे.

नितीन गिलबिले हत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, अखेर मुख्य आरोपी...
नितीन गिलबिले हत्या प्रकरण
| Updated on: Nov 14, 2025 | 10:42 PM

पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसा ढवळ्या एका तरुणाची फॉर्च्युनर गाडीत जवळून गोळ्या झाडून निर्घृण हत्या करुन त्याचा मृतादेहावरुन कार नेणाऱ्या धक्कादायक प्रकरणातील प्रमुख आरोपीलाही अखेर अटक करण्यात यश आहे. या फॉर्च्युनरचा गाडीचा आणि त्यातील नितीन गिलबिले याचा मृतदेह रस्त्यात टाकून आरोपी फरार झाल्याचा सीसीटीव्ही व्हायरल झाला होता.

दोन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये वडमुखवडी परिसरातील अलंकापुरम रोडलगत नितीन गिलबिले यांची फॉर्च्युनर गाडीत जवळून पिस्तूलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हत्या केल्यानंतर आरोपी अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर हे दोघे घटनास्थळावरून पळून गेले होते. या दोघांचा माग काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी स्वतंत्र पथके तयार केली होती. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवली होती.

नितीन गिलबिले हत्याकांडातील फरार झालेला मुख्य आरोपी अमित पठारे याला अटक झाली आहे. याआधी या हत्याकांडातील विक्रांत ठाकूर याला अटक करण्यात यश आले होते. त्यामुळे या सनसनाटी हत्याकांडातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. या आरोपींच्या चौकशीतून या खुनामागील नेमके कारण लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

 संपत्तीच्या वादातून हत्या

दोन दिवसांपूर्वी वडमुखवडी परिसरातील अलंकापुरम रोडलगत नितीन गिलबिले यांच्या फॉर्च्युनर गाडीत त्याच्या दोघा साथीदारांनी त्यांची जवळून गोळ्या घालून त्यांची हत्या केली होती. हत्या केल्यानंतर आरोपी अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर घटनास्थळावरून पळून गेले होते. या दोघांचा माग काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी स्वतंत्र पथके तयार करून मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवली होती. प्राथमिक तपासात प्लॉटिंग आणि संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे.

एम्बीव्हॅलीतून अटक

नितीन गिलबिले याला फॉर्च्युनर गाडीत बसवून त्याची कारमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्याला वडमुखवडी परिसरातील अलंकापुरम रोडलगत कारमधून आणून त्याचा मृतदेह रस्त्यात टाकून त्याच्या पायावरुन गाडी नेण्यात आली होती. त्याच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अमित पठारे याला लोणावळ्यातील एम्बीव्हॅलीतून पोलिसांनी अटक केल्याचे सांगतले जात आहे.