Mumbai Police : अंमली पदार्थ विरोधी पथकाला मोठं यश, 1 हजार कोटींपेक्षा जास्त रकमेच एमडी ड्रग्स जप्त

| Updated on: Aug 04, 2022 | 2:42 PM

ताब्यात घेतलेल्या पाच लोकांची पोलिस वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ही फॅक्टरी कोण चालवत. फॅक्टरीचा मालक कोण आहे. तिथं किती कर्मचारी काम करतात याची सगळी चौकशी होण्याची शक्यता आहे.

Mumbai Police : अंमली पदार्थ विरोधी पथकाला मोठं यश, 1 हजार कोटींपेक्षा जास्त रकमेच एमडी ड्रग्स जप्त
अंमली पदार्थ विरोधी पथकाला मोठं यश
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : मुंबई पोलिस (Mumbai Police) त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे प्रसिध्द आहेत. कारण अनेक गुन्ह्याची उकल त्यांनी काही तासात केली आहे. तसेच एखादा घटना होणार असल्याची पूर्व कल्पना जरी मिळाली तरी मुंबई पोलिस अधिक सतर्क राहते. नुकतचं मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मोठं यश आलं आहे. 1 हजार कोटींपेक्षा जास्त रकमेच एमडी ड्रग्स (Drugs) अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलं जप्त केलं आहे. मुंबई बाहेर सुरू असणाऱ्या एका ड्रग्स फॅक्टरीवर कारवाई करत जवळपास 700 किलो एमडी ड्रग्स अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Team) जप्त केले आहे. या प्रकरणात एकूण 5 आरोपीना अटक करण्यात आली आहे. ताब्यात घेतलेल्या पाच आरोपीची चौकशी पोलिस करीत आहेत.

1 हजार कोटींपेक्षा जास्त रकमेच एमडी ड्रग्स अंमली

याच्या आगोदर मुंबई पोलिसांनी अशा अनेक कारवाया केल्या आहेत. सतत अशा कारवाया होत असतात. तरीही अशा पद्धतीची गुन्हेगारी वाढत आहे. काल झालेल्या केलेल्या कारवाईमध्ये 1 हजार कोटींपेक्षा जास्त रकमेच एमडी ड्रग्स अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलं जप्त केलं. ही कारवाई एका ड्रग्स फॅक्टरीवर करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांचं नेहमीप्रमाणे कौतुक होतं आहे. शहरातील गुन्हेगारी रोखण्याचं मोठं आव्हान पोलिसांच्यावरती आहे. ज्यांना ताब्यात घेतलं आहे त्यांची कसून चौकशी होणार आहे.

आरोपीची कसून चौकशी होणार

ताब्यात घेतलेल्या पाच लोकांची पोलिस वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ही फॅक्टरी कोण चालवत. फॅक्टरीचा मालक कोण आहे. तिथं किती कर्मचारी काम करतात याची सगळी चौकशी होण्याची शक्यता आहे. यातील चार आरोपींना मुंबईत अटक करण्यात आली आहे. तर एका व्यक्तीला नालासोपारा येथे अटक करण्यात आली होती, असे अधिकाऱ्याने सांगितले. अलिकडच्या काळात शहर पोलिसांनी केलेली ही सर्वात मोठी अमली पदार्थांची कारवाई आहे, असेही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा