AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रश्मिका मंदानाच्या लग्नानंतर आईचा प्रायव्हेट ऑडिओ लीक; रक्षित शेट्टीशी साखरपुडा मोडण्यामागचं धक्कादायक कारण समोर

विजय देवरकोंडाशी लग्नाच्या काही दिवसांनंतर रश्मिका मंदानाची आई सुमन मंदाना यांचा एक ऑडिओ लीक झाला आहे. यामध्ये त्या रश्मिका आणि रक्षित शेट्टी यांच्या मोडलेल्या साखरपुड्याविषयी बोलत होत्या.

रश्मिका मंदानाच्या लग्नानंतर आईचा प्रायव्हेट ऑडिओ लीक; रक्षित शेट्टीशी साखरपुडा मोडण्यामागचं धक्कादायक कारण समोर
रश्मिका मंदाना, रक्षित शेट्टीImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 13, 2026 | 9:20 AM
Share

अभिनेत्री रश्मिका मंदानाने काही दिवसांपूर्वीच अभिनेता विजय देवरकोंडाशी लग्नगाठ बांधत आयुष्याची नवी सुरुवात केली. परंतु त्यानंतर काही दिवसांतच रश्मिकाचं खासगी आयुष्य पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. तिची आई सुमन मंदाना यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विजयशी लग्न करण्यापूर्वी रश्मिकाचा काही वर्षांपूर्वी अभिनेता रक्षित शेट्टीशी साखरपुडा झाला होता. परंतु काही कारणास्तव तिने हा साखरपुडा मोडला होता. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, याविषयी तिची आई एका मुलाखतीत व्यक्त झाली होती. त्याचीच ऑडिओ क्लिप आता व्हायरल होत आहे.

आठ वर्षांपूर्वी रश्मिकाची आई सुमन मंदाना यांनी एका कन्नड वृत्तवाहिनीला यासंदर्भात मुलाखत दिली होती. रश्मिका आणि कन्नड अभिनेता रक्षित शेट्टी हे 2016 मध्ये ‘किरिक पार्टी’ या चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. त्यानंतर लगेचच 2017 मध्ये त्यांनी साखरपुडा केला. परंतु 2018 मध्ये त्यांनी हा साखरपुडा मोडत सर्वांनाच धक्का दिला. ‘वन इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, रश्मिकाच्या आईने त्यावेळी वरिष्ठ पत्रकार महेश देवीशेट्टी यांना मुलाखत दिली होती आणि त्यात त्यांनी सर्वकाही खुलासा केला होता.

ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय?

“रश्मिका त्यावेळी लहान असतानाही आम्ही त्यांच्या नात्याला मान्यता दिली होती. परंतु साखरपुडादरम्यान तणाव वाढला आणि दोन कुटुंबांमध्ये वाद झाले. रक्षित छोट्या-छोट्या मुद्द्यांवरून भांडणं करायचा आणि त्याने रश्मिकाच्या व्यावसायिक निर्णयांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तिला गीता गोविंदम या चित्रपटाची ऑफर मिळाली, तेव्हा सोशल मीडियावर अभिनयक्षेत्र सोडणार अशी पोस्ट लिहिण्यासाठी तिच्यावर दबाव आणला होता. गीता गोविंदमच्या रिलीजच्या आदल्या रात्री रक्षित आणि त्याच्या मॅनेजरने तिला रात्री उशिरा फोन केला आणि हैदराबादहून ताबडतोब बेंगळुरूला भेटण्यासाठी बोलावलं होतं. दोघांमधील मतभेदांमुळे वाद निर्माण झाले. रक्षितने तिला पाठिंबा दिला नाही, उलट तिच्याशीच वाद घातला”, असा खुलासा सुमन मंदाना यांनी या मुलाखतीत केला होता.

रक्षितने लग्नानंतर रश्मिकाला अभिनयक्षेत्र सोडण्याची अट ठेवली होती. यासाठी तिने सोशल मीडियावर पोस्ट लिहावी, असा आग्रह त्याने धरल्याचा दावा सुमन यांनी केला. “रश्मिकाने लग्नानंतर अभिनय सोडणार असल्याचं ट्विट करावं, ही त्याची शेवटची अट होती. माझ्या मुलीची काय चूक होती? मी जाऊन त्यांची माफी मागावी, असं मला सांगण्यात आलं होतं. मी विनाकारण का माफी मागू? मी माझ्या आयुष्यात अनेक लोकांची मदत केली आहे. त्यामुळे ते वेगळे झाले ते बरंच झालं”, अशा शब्दांत रश्मिकाची आई व्यक्त झाली होती.

Follow Us
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले