Osmanabad ED Action : उस्मानाबादमध्ये ब्रिवरीज कंपनीची मालमत्ता ईडीकडून जप्त, मनी लाँड्रिंग कायद्याअंतर्गत कारवाई

| Updated on: Jul 08, 2022 | 6:31 PM

ईडीच्या धाडीत ब्रिवरीज कंपनीची एकूण 45 कोटी 50 लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. उमरगा MIDC मध्ये हैद्राबाद मुंबई मार्गावर ही कंपनी असून ती सध्या बंद आहे. मनी लॉंड्रींग कायदा 2002 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

Osmanabad ED Action : उस्मानाबादमध्ये ब्रिवरीज कंपनीची मालमत्ता ईडीकडून जप्त, मनी लाँड्रिंग कायद्याअंतर्गत कारवाई
उस्मानाबादमध्ये ब्रिवरीज कंपनीची मालमत्ता ईडीकडून जप्त
Image Credit source: TV9
Follow us on

उस्मानाबाद : उस्मानाबादमध्ये उमरगा MIDC येथील जोगेश्वरी ब्रिवरीज प्रा. लि. कंपनीची मालमत्ता (Property) ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. ईडी (ED)च्या धाडीत एकूण 45 कोटी 50 लाखांची मालमत्ता जप्त (Seized) करण्यात आली आहे. कोल्हापूर येथील उमेश शिंदे व देवेंद्र शिंदे हे या कंपनीचे संचालक आहेत. ईडीने फॅक्टरिची मालमत्ता आणि मशिनरी जप्त केली आहे. ईडीने ट्विटरवर पोस्ट करुन कारवाईची माहिती दिली. उमरगा MIDC मध्ये हैद्राबाद मुंबई मार्गावर ही कंपनी असून ती सध्या बंद आहे. मनी लॉंड्रींग कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे.

मनी लाँड्रिंग कायद्याअंतर्गत कारवाई

कोल्हापूर येथील उमेश धोंडीराम शिंदे व देवेंद्र उमेश शिंदे हे पिता पुत्र संचालक असलेली फॅक्टरिची मालमत्ता व मशिनरी जप्त केली असल्याचे ईडीने ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले आहे. ईडीने त्यांच्या ट्विटरवर पोस्ट करुन कारवाईची माहिती दिली आहे. उमरगा MIDC मध्ये हैद्राबाद मुंबई मार्गावर ही कंपनी असून ती सध्या बंद आहे. मनी लॉंड्रींग कायदा 2002 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

2009 मध्ये झाली होती कंपनीची स्थापना

कंपनी कायद्यातर्गत ही जोगेश्वरी ब्रिव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची 5 मार्च 2009 रोजी नोंदणी केली आहे. त्यानुसार 15 कोटी हे या कंपनीची नोंदणी करतानाचे शेअर कॅपिटल आहे तर पेड कॅपिटल हे 2 कोटी आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाची शेवटची बैठक ही 30 नोव्हेंबर 2021 रोजी झाली असून 31 मार्च 2021 पर्यंतचे ऑडिट लेखापरीक्षण करण्यात आले आहे. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स या अंतर्गत याची नोंदणी असून दारू निर्मिती हा उद्देश आहे. ही कंपनी दारू निर्मिती क्षेत्रात काम करीत असून गेली 5-6 वर्षांपासून या ठिकाणचे काम बंद असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

जिल्ह्यातील या वर्षातील दुसरी कारवाई

उस्मानाबाद जिल्ह्यातील या वर्षातील ईडीची ही दुसरी कारवाई असून यामुळे खळबळ उडाली आहे. यापूर्वी ईडीने माजी मंत्री नवाब मलिक यांची उस्मानाबाद तालुक्यातील दुमले जवळा येथे असलेली 150 एकर जमीन व त्यावर असलेला बंगला जप्त केला होता. मलिक सध्या तुरुंगात आहेत. मलिक यांनी मेहजबीन नवाब मलिक, सना नवाब मलिक, अमीर नवाब मलिक, निलोफर समीर खान, फराज नवाब मलिक व बुश्रा फराज या नावाने जमीन खरेदी केली आहे. जमीन् बागायती असताना कोरडवाहू जमीन दाखवून मूल्यांकन 1 कोटी 20 लाखाने कमी केले आहे. कागदोपत्री 2 कोटी 7 लाखाला जमीन खरेदी केल्याचे नमूद केले. मात्र प्रत्यक्षात जास्त रक्कम दिली गेल्याचा आरोप आहे. हा पैसा बेनामी असल्याचा आरोप असून ही संपत्ती जप्त केली आहे. ईडीने या जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करीत जप्तीची कारवाई 13 एप्रिल 2022 रोजी केली होती. (Assets worth Rs 45.50 crore of Breweries Company seized from ED in Osmanabad)