AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arrest Warrant Against Sanjay Raut : सोमय्यांशी पंगा भारी पडला! संजय राऊतांना अटक होणार? अटक वॉरंट जारी

शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आली आहे. शिवडी कोर्टाने संजय राऊतांविरोधात हे अटक वॉरंट जारी केले आहे.

Arrest Warrant Against Sanjay Raut : सोमय्यांशी पंगा भारी पडला! संजय राऊतांना अटक होणार? अटक वॉरंट जारी
| Updated on: Jul 08, 2022 | 5:04 PM
Share

शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या पत्नी मेधा सोमय्या (Medha Somaiya)यांनी संजय राऊतांविरोधात बदनामीची तक्रार केली होती. या प्रकरणी कोर्टाने सोमय्या यांना दणका दिला आहे. शिवडी कोर्टाने संजय राऊतांविरोधात हे अटक वॉरंट जारी केले आहे. संजय राऊतांसाठी हा मोठा झटका मानला जात आहे.

संजय राऊत यांनी मेधा सोमय्या आणि किरीट सोमय्या  यांच्यावर टॉयलेट घोटाळ्याचे आरोप केले होते.  मेधा सोमय्या यांनी या प्रकरणी मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली होती. भादंवि कलम 503, 506 आणि 509 अंतर्गत ही तक्रार दाखल करण्यात आली होती. राऊत यांच्या आरोपामुळे आपली बदनामी झाल्याचे मेधा यांनी तक्रारीत म्हंटले होते.

सोमय्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. किरीट सोमय्यांकडून राऊतांविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता संजय राऊत यांना नोटीस पाठवण्यात आली होती. तसेच मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता.

सोमय्यांनी दाखल केलेल्या खटल्यानंतर शिवडी कोर्टाकडून राऊत यांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. पण राऊत  हजर न राहिल्याने कोर्टा त्यांच्याविरोधात जामीनपत्र अटक वॉरंट जारी केले आहे. अटक झाल्याच पाच हजार रुपयांच्या जामीनावर राोऊतांची सुटका होईल.

काय आहे शौचालय घोटाळा प्रकरण?

मीरा भाईंदरमध्ये 154 सार्वजनिक शौचालयं बांधण्यात आली. यातील 16 शौचालयं बांधायचं काम किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला देण्यात आलेलं. या प्रकरणी खोटी कागदपत्र देऊन मीरा भाईंदर पालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप शिवसेना आमदारांनी केला होता. प्रताप सरनाईक यांच्याकडून हा आरोप करण्यात आलेला होता.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.