atik ahmad shot dead : अतिक-अशरफचा खात्मा या पिस्तुलातून झाला, मेड इन तुर्की ‘जिगाना’चा वापर

गुंडगिरीतून राजकारणात आलेल्या अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांची हत्या ज्या पिस्तुलातून झाली ते पिस्तुल परदेशी बनावटीचे आहे.

atik ahmad shot dead : अतिक-अशरफचा खात्मा या पिस्तुलातून झाला, मेड इन तुर्की जिगानाचा वापर
zigana1
Image Credit source: socialmedia
| Updated on: Apr 16, 2023 | 2:24 PM

नवी दिल्ली : गॅंगस्टर टर्न पॉलिटीशीयन अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या पोलिसांच्या देखत झालेल्या हत्याकांडाबाबत एकदम नविनच माहीती समोर आली आहे. शनिवारी रात्री प्रयागराज येथे पत्रकारांच्या वेशात आलेल्या हल्लेखोरांनी अत्यंत जवळून अठरा राऊंड फायर करून दोघा भावांची हत्या केली. अतिक याच्या कानशिलावर पॉईंट ब्लॅंक रेंजवर फायर करून त्याला मारण्यात आले. त्यामुळे अतिक जाग्यावर ठार झाला. या हत्याकांडातून एक गोष्ट बाहेर आली ती ही की ज्या पिस्तुलातून अतिक आणि त्याच्या भावाला मारले ते पिस्तुल मेड इन तुर्की ‘जिगाना’ कंपनीचे होते. याचे कनेक्शन पाकिस्तानशी असल्याचेही उघड झाले आहे.

गॅंगस्टर टर्न पॉलिटीशियन माफीया डॉन समाजवादी पार्टीचे माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांची शनिवारी रात्री मेडीकलसाठी नेत असतानाच हॉस्पिटलच्या आवारातच मिडीयाच्या उपस्थित गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणात उत्तरप्रदेश पोलिसांनी तीन जणांना अटक केली. अतिक आणि त्याच्या भावावर गोळी झाडणारे पळून जाता ते पोलिसांना सरेंडर झाले आहेत.

मेड इन तुर्की पिस्तुल आणि पाकशी कनेक्शन

गुंडगिरीतून राजकारणात आलेल्या अतिक आणि अशरफ या दोघा जणांची हत्या ज्या पिस्तुलातून झाली ते पिस्तुल परदेशी बनावटीचे आहे. हे पिस्तुल तुर्कस्थान निर्मित जिगाना कंपनीचे आहे. अशा प्रकारची पिस्तुले ही पाकिस्तानातून भारतात अनधिकृतरित्या आयात केली जातात अशी देखील माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे अतिकच्या हत्येचे कनेक्शन पाकिस्तानशी तर नाही ना याचा तपास पोलिस अधिकारी या अॅंगलने देखील करीत आहेत.

युपी पोलिसांनी एफआयआर दाखल केला

अतिक आणि अशरफ हत्याकांडात उत्तर प्रदेशातील प्रयागराज पोलीसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपी लवलेश तिवारी, सनी आणि अरूण मौर्य यांच्या विरोधात हत्येसह इतर गंभीर कलमे दाखल केली आहेत. तिघा आरोपींना आज न्यायदंडाधिऱ्यासमोर हजर केले जाणार आहे.

पत्रकारांसाठी नविन एसओपी 

अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघा गुंडांची पत्रकारांच्या वेशात आलेल्या तरूणांनी हत्या केल्याने आता केंद्रीय गृहमंत्रालयाने या पत्रकारांच्यासाठी नविन एसओपी जाहीर केली आहे. त्यामुळे पत्रकारांच्या सुरक्षेसाठी नवे नियम आणि आचारसंहिता जाहीर करणार असल्याचे वृत्तसंस्था एएनआयने ट्वीट करीत म्हटले आहे.