AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलीकडे एकटक बघणाऱ्या रोडरोमियोला सहा महिन्यांची सक्तमजुरी

आरोपी दामोधर हा अनेक दिवस एका 13 वर्षीय मुलीकडे एकटक पाहत असल्याचा आरोप आहे. (Aurangabad Road Romeo Staring Girl)

मुलीकडे एकटक बघणाऱ्या रोडरोमियोला सहा महिन्यांची सक्तमजुरी
कोर्ट
| Updated on: Feb 08, 2021 | 8:23 AM
Share

औरंगाबाद : मुलीकडे एकटक बघणाऱ्या रोडरोमियोला सहा महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षा मिळाली. 13 वर्षीय मुलीकडे एकटक पाहणाऱ्या आरोपीला शिक्षा मिळाली. औरंगाबादेत घडलेल्या या घटनेची सर्वत्र चर्चा आहे. (Aurangabad Road Romeo gets 6 month imprisonment for Staring at Minor Girl)

औरंगाबाद जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली. दामोधर कन्हैया राबडा असं आरोपीचं नाव आहे. आरोपी दामोधर हा अनेक दिवस एका 13 वर्षीय मुलीकडे एकटक पाहत असल्याचा आरोप आहे. अल्पवयीन मुलीने औरंगाबागेतील जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. सबळ पुराव्यानंतर आरोपीला सहा महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षा मिळाली.

म्हणजे अत्याचार नाही, हायकोर्टाचा निर्णय

लैंगिक हेतू नसताना मुलीच्या हाताला नकळतपणे स्पर्श केला म्हणजे मुलाने अत्याचार केला असा त्याचा अर्थ होत नाही, असे महत्त्वाचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. तसेच आरोपीला जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर झालेल्या 27 वर्षीय तरुणाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे.

हात पकडून प्रपोज, सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी

दाखल केलेल्या तक्रारीनुसार, 27 वर्षीय आरोपीचे शेजारी राहणाऱ्या 17 वर्षीय मुलीवर प्रेम होते. ही मुलगी क्लासला जाताना आरोपीने मुलीला प्रपोज केले. मुलीने नकार दिल्याने आरोपीने मुलीचा हात पकडून तिला समजावण्याचा प्रयत्न केला. आरोपीने हात पकडल्यानंतर मुलीने स्व:तला त्याच्या तावडीतून सोडवत तेथून पळ काढला. त्यांनतर घडलेल्या प्रकार कुणालाही सागून नकोस, नाहीतर तुझी सोशल मीडियावर बदनामी करेल असे आरोपीने मुलीला सांगितले. ही घटना घडल्यानंतर तब्बल 6 महिन्यांनतर मुलीने या आरोपीविरोधात तक्रार दाखल केली होती. (Aurangabad Road Romeo Staring Girl)

सफाळ्यात अनैतिक संबंधांतून हत्या

सफाळयात अनैतिक संबंधातून दुहेरी हत्याकांड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत नवऱ्याने बायकोला आणि तिच्या प्रियकराची जागीच हत्या केली आहे. सफाळे कपासे या ठिकाणी ही घटना घडली. या प्रकरणी आरोपी नवऱ्याला अटक करण्यात आली आहे.

पालघर तालुक्यातील सफाळे कपासे ठाकूरपाडा या ठिकाणी दिलीप तानाजी ठाकरे हे राहतात. यावेळी दिलीप यांनी राहत्या घरी पत्नी आणि तिच्या प्रियकराला दोघांनाही  पकडले. यानंतर नवऱ्याने रागाच्या भरात पत्नीसह प्रियकराच्या डोक्यावर कुऱ्हाडीचा घाव घातला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या : 

आधी बाळाचं मस्तक धडा वेगळं केलं नंतर ती वाशीच्या खाडीवर पोहोचली, पुढं जे घडलं त्यानं हादरवलं

तिनं आधी पोर गमावलं, नंतर नवऱ्याचा दंडुक्याचा मार, नंतर जीव, बीडचा खून आरसा दाखवणारा

(Aurangabad Road Romeo gets 6 month imprisonment for Staring at Minor Girl)

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.