अनवधानाने स्पर्श केला म्हणजे लैंगिक अत्याचार नाही; वाचा प्रकरण काय? कोर्ट काय म्हणतं?

नकळत मुलीच्या हाताला स्पर्श केल्यावर मुलाने अत्याचार केला असा त्याचा अर्थ होत नाही, असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने एका आरोपीला जामीन मंजूर केला आहे. (molestation of minor girl)

अनवधानाने स्पर्श केला म्हणजे लैंगिक अत्याचार नाही; वाचा प्रकरण काय? कोर्ट काय म्हणतं?

मुंबई : लैंगिक हेतू नसताना मुलीच्या हाताला नकळतपणे स्पर्श केला म्हणजे मुलाने अत्याचार केला असा त्याचा अर्थ होत नाही, असे महत्त्वाचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. तसेच आरोपीला जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर झालेल्या 27 वर्षीय तरुणाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. हा आरोपी मूळचा बारामती येथील आहे. (Bail granted to accused of molesting a minor girl)

मुलीची तक्रार काय?

या खटल्यातील आरोपी मूळचा बारामती येथील रहिवासी आहे. त्याचे वय 27 वर्षे असून त्याच्यावर शेजारी राहणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या आरोपीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असल्यामुळे त्याला अद्याप जामीन मिळाला नव्हता. मात्र, प्रेम व्यक्त करण्यासाठी मुलाने मुलीचा नकळतपणे हात धरला असेल तर तो अत्याचाराचा गुन्हा ठरत नाही, असे सांगत न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला.

हात पकडून प्रपोज, सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी

दाखल केलेल्या तक्रारीनुसार, 27 वर्षीय आरोपीचे शेजारी राहणाऱ्या 17 वर्षीय मुलीवर प्रेम होते. ही मुलगी क्लासला जाताना आरोपीने मुलीला प्रपोज केले. मुलीने नकार दिल्याने आरोपीने मुलीचा हात पकडून तिला समजावण्याचा प्रयत्न केला. आरोपीने हात पकडल्यानंतर मुलीने स्व:तला त्याच्या तावडीतून सोडवत तेथून पळ काढला. त्यांनतर घडलेल्या प्रकार कुणालाही सागून नकोस, नाहीतर तुझी सोशल मीडियावर बदनामी करेल असे आरोपीने मुलीला सांगितले. ही घटना घडल्यानंतर तब्बल 6 महिन्यांनतर मुलीने या आरोपीविरोधात तक्रार दाखल केली होती.

आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा

मुलीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखत कारवाई सुरु केली. पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. आरोपीच्या जामिनाचा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर आरोपीने पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला. आरोपीच्या जामीन अर्जावर सुनावणीमध्ये  नकळत स्पर्श केल्यामुळे अत्याचार केला असे सिद्ध होत नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला.

न्यायालय काय म्हणाले?

अल्पवयीन मुलीच्या खासगी भागाला स्पर्श केला तरच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. या प्रकरणात असे काही सिद्ध होत नाही, असे न्यायालयाने नोंदवले आहे. तसेच, आरोपीने मुलीला फक्त एकटक पाहिलेले आहे. मुलाच्या मनात लैंगिक अत्याचाराचा कोणताही उद्देश नव्हता. तसेच, आरोपीने फक्त समजावण्यासाठी मुलीचा हात पडकला होता. त्यामुळे तो अत्याचाराचा गुन्हा घडत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

संबंधित बातम्या :

50 लहान मुलांचे लैंगिक शोषण, पॉर्न व्हिडीओंची विक्री, ज्युनिअर इंजिनीअरच्या पत्नीला अटक

आईच्या प्रियकराची निर्घृण हत्या, मुंबईतील धारावी हादरली

(Bail granted to accused of molesting a minor girl)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI