
पाटणा | 2 ऑक्टोबर 2023 : उत्तर प्रदेशातील एटामध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. अवघ्या काही पैशांच्या मोहापायी काही तरूणांना माणूसकीला काळिमा फासणारे कृ्त्य केले. झटपट पैसे मिळवण्याच्या लोभाने त्यांनी एक धक्कादायक कट रचला. विम्याचे पैसे (insurance money) हडपण्यासाठी तरूणांनी कट रचून एका तरूणाची हत्या केली. हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. त्यांनी केलेल्या चौकशीतीन धक्कादायक माहिती समोर आली. फेसबुकवरील पोस्ट पाहून हत्येचा कट रचल्याचे आरोपींनी कबूल केले.
असा रचला कट
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे पाच दिवसांपूर्वी निधौली कळण पोलीस ठाण्याजवळ एका तरुणाचा खून (murder) झाला होता. आपला मुलगा चरण सिंग आणि सून यांच्यात वाद झाला . त्यानंतर १५ दिवसांपूर्वी सून माहेर निघून गेली आणि २४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी आपला मुलगाही घरातून निघून गेला अशी तक्रार नागला सीर गावातील रहिवासी सोवरन सिंह यांनी 25 सप्टेंबर रोजी निधौली कळण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
त्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला. अखेर 25 सप्टेंबर रोजी निधौली कळण जवळ असलेल्या गहराना येथेच चरण सिंग याचा मृतदेह सापडला. त्याच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. पोलिसांनी ही बातमी त्याचे वडील आणि कुटुंबियांना देण्यात आली आणि त्यांच्या दु:खाला पारावार उरला नाही. पोस्टमॉर्टमनंतर त्याचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.
या हत्येचा तपास करत असतानाच 29 सप्टेंबर रोजी पोलिसांनी वीरेंद्र नावाच्या व्यक्तीला पकडले. तर 30 सप्टेंबर रोजी रघुराज नावाच्या दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या घरातून अटक करण्यात आली. पोलिसांनी त्या दोघांची कसून चौकशी केली. त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळाजवळ असलेल्या शेतातून मृत चरणसिंगचा मोबाईल, आधारकार्ड, पॅनकार्ड, चप्पल आणि तुटलेले सिम जप्त केले.
कबूल केला गुन्हा
दोन्ही आरोपींनी हा गुन्हा केल्याचे कबूल केला, असे पोलिसांनी सांगितले. फेसबूकवरील एक पोस्ट वाचून त्यांनी हत्येचा कट रचल्याचेही कबूल केले. त्यासाठी पहिल्यांदा त्यांनी चरण सिंहच्या छोट्या भावाशी मैत्री केली, तो मानसिकरित्या विकलांग होता. नंतर हळूहळू त्याचा विश्वास संपादन करून त्यांनी चरण सिंह याचे आधार कार्ड पळवले आणि त्याच्या छोट्या भावाचे बँकेत खातं उघडलं.
त्यानंतर आरोपींनी चरण सिंहचा 30 लाख रुपयांचा विमा काढला आणि त्याचा नॉमिनी म्हणून त्याच्याच छोट्या भावाचे नाव टाकले. त्यानंतर प्लान नुसार, आरोपीनी चरण सिंह याची हत्या केली. त्याचा मृत्यू झाल्यावर विम्याचे पैसे त्याच्या छोट्या भावाला मिळतील आणि आपण ते हिसकावून घेऊ आणि दोघांमध्ये वाटून टाकू असा प्लान आरोपींनी केला होता. मात्र त्या पूर्वीच पोलिसांनी त्या दोघांना बेड्या ठोकल्या आणि तुरूंगात टाकले.