वडिल आईला स्टेशनला सोडायला गेले, मुलं घरी झोपली होती; घरात घुसले चोरटे

| Updated on: Oct 18, 2022 | 7:31 PM

मंगळवारी 18 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 वाजता देविदास पत्नीला सोडण्यासाठी कल्याण स्टेशनला गेले होते. यावेळी त्यांची दोन लहान मुलं घरातच झोपलेली होती.

वडिल आईला स्टेशनला सोडायला गेले, मुलं घरी झोपली होती; घरात घुसले चोरटे
अंबरनाथच्या नेवाळी गावात घरफोडी
Image Credit source: TV9
Follow us on

अंबरनाथ : अंबरनाथच्या नेवाळी गावात घरफोडीची एक थरारक घटना घडली आहे. एका टॅक्सी चालकाच्या घरात ही घरफोडी (Robbery) करण्यात आली आहे. विशेष म्हणजे घटना घडली तेव्हा घरात केवळ टॅक्सी चालकाची दोन लहान मुलं झोपलेली होती. चोरट्यांनी घरात घुसून घरातून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरून (Jewellery and Cash Theft) नेले. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात (Hill line Police Station) घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देविदास हे पेशाने टॅक्सी चालक

अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी गावात देविदास जाधव हे आपल्या कुटुंबासमवेत राहतात. देविदास हे पेशाने टॅक्सी चालक आहेत. मंगळवारी 18 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 वाजता देविदास पत्नीला सोडण्यासाठी कल्याण स्टेशनला गेले होते. यावेळी त्यांची दोन लहान मुलं घरातच झोपलेली होती.

मुलं उठली का पाहण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा अॅप चालू केलं

यादरम्यान मुलं उठली असतील, कॅमेरात बघा असं पत्नीने देविदास यांना सांगितलं. यानंतर देविदास यांनी मोबाईलमधील सीसीटीव्ही कॅमेराचं अॅप चालू केलं असता त्यांना घराजवळ तीन इसम वावरताना दिसले. त्यामुळं त्यांनी तिथून गाडी पळवत थेट घर गाठलं.

हे सुद्धा वाचा

चोरट्याचा पाठलाग केला मात्र निष्फळ ठरला

यावेळी घराच्या आतमध्ये एक चोरटा कपाटातलं सामान बाहेर काढून शोधाशोध करत असल्याचं त्यांना दिसलं. देविदास यांना पाहताच या चोरट्यानं तिथून पळ काढला. चोरट्याचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्नही देविदास जाधव यांनी केला, मात्र तो निष्फळ ठरला.

याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतायत.