AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bus stop stolen | असं ऐकलय का? भारतातल्या एका शहरात अख्खा बस स्टॉप चोरला, किंमत वाचून विस्फारतील डोळे

Bus stop stolen | या बस स्टॉपची किंमत किती होती?. या बस स्टॉपची महागडी किंमत फक्त चोरट्यांच्या लक्षात आली. त्यांनी अख्खा बस स्टॉपच पळवला. भारतातल्या एका मोठ्या शहरात हे घडलय.

Bus stop stolen | असं ऐकलय का? भारतातल्या एका शहरात अख्खा बस स्टॉप चोरला, किंमत वाचून विस्फारतील डोळे
Bus Stop Stolen
| Updated on: Oct 06, 2023 | 1:19 PM
Share

बंगळुरु : सोन्याची चेन, दागिने, घड्याळ, मोबाइल या महागड्या वस्तुंची चोरी होते, हे आपण ऐकून होतो. पण बस स्टॉप चोरीला गेल्याच तुम्ही कधी ऐकलय का?. हो भारतातल्या एका राज्यात हे घडलय, चोरट्यांनी अख्ख्याच्या अख्खा बस स्टॉप चोरला, मागे काही सोडलं नाही. महत्त्वाच म्हणजे आठवड्याभरापूर्वी हा बस स्टॉप सुरु झाला होता. नागरिक या ठिकाणाहून बस पकडायचे. आडोशाला उभे रहायचे. या बस स्टॉपची महागडी किंमत फक्त चोरट्यांच्या लक्षात आली. त्यांनी अख्खा बस स्टॉपच पळवला.

बंगळुरुच्या कनिनघम रोडवर हा बस स्टॉप होता. बंगळुरु महानगर वाहतूक प्राधिकरण (BMTC) कडून बस स्टॉप संचलित व्हायचा. एन रवी रेड्डी यांनी बस स्टॉप चोरी झाल्याची तक्रार नोंदवली. BMTC बस स्टॉप बांधण्याची जबाबदारी असलेल्या कंपनीचे ते उपाध्यक्ष आहेत. त्यांनी 30 सप्टेंबरला तक्रार नोंदवली. कनिनघम रोडवरील चोरी झालेल्या या बस स्टॉपची किंमत 10 लाख रुपये आहे. सर्व स्टील चोरांनी पळवलं. एकरात्रीत बस स्टॉप गायब

मार्च महिन्यात तीन दशकापूर्वीचा HRBR लेआऊट रोडवरील बस स्टॉप एकारात्रीत गायब झाला होता. कल्याण नगर येथील बस स्टॉप लायन्स कल्बने 1990 साली डोनेट केला होता. व्यावसायिक आस्थापनेसाठी हा बस स्टॉप हटवण्यात आला होता. बस स्टॉप हटवला असेल, तर ते काम बृहत बंगळुरु महापालिकेच आहे, असं बंगळुरु महानगर वाहतूक प्राधिकरणाकडून सांगण्यात आलं. 2015 साली होरायझन शाळेजवळचा दुपानाहाली बस स्टॉप एकरात्रीत गायब झाला होता.

दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.