AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुझ्या बापाला घेऊन ये, नाहीतर… ते 3 कॉल रेकॉर्ड समोर, पुन्हा बीड हादरले

बीडमधील व्यावसायिकाच्या आत्महत्यामुळे खळबळ माजली. यानंतर सावकार आणि मयत राम फटाले यांच्या संभाषणाच्या दोन अतिशय धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग रात्री व्हायरल झाल्या होत्या.

तुझ्या बापाला घेऊन ये, नाहीतर… ते 3 कॉल रेकॉर्ड समोर, पुन्हा बीड हादरले
फटाले आत्महत्या प्रकरणातील 3 कॉल रेकॉर्डिंग व्हायरलImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jul 09, 2025 | 9:48 AM
Share

बीडमध्ये सावकारच्या जाचाला कंटाळू कापड व्यावसायिकाने आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली होती. आता याच प्रकरणातील एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. फटाले आत्महत्या प्रकरणातील 3 कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली असून त्यामध्ये सावकार, डॉ. लक्ष्मण जाधव यांनी फटालेंसमोर अरेरावीची भाषा करत शिवीगाळ केल्याचे उघड झाले आहे. काही दिवसांपूर्वी बीडमधील कापड व्यावसायिक राम पटाले यांनी सावकार लक्ष्मण जाधव यांच्या जाचाला कंटाळून गळफास लावून घेत आत्महत्या केली होती. मात्र त्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहीत सावकाराच्या  चाजामुळे हे कृत्य करत असल्याचे त्यात नमूद केलं होतं.

याप्रकरणी फटाले यांच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केल्यावर सात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला , तीन आरोपींना 10 जुलै पर्यंतची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सावकार डॉक्टर लक्ष्मण जाधव आणि मयत राम फटाले यांच्या संभाषणाच्या दोन अतिशय धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग रात्री व्हायरल झाल्या होत्या. आता आणखी 3 रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहेत.  मात्र टीव्ही9 मराठी या रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही.

3 कॉल रेकॉर्डिग व्हायरल

याच प्रकरणात आज आणखी 3 कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहेत. सदरील कॉल रेकॉर्डिंग मध्ये सावकार लक्ष्मण जाधव हा फटालेंना दम देत असल्याचे ऐकू येत आहे. या कॉल रेकॉर्डिंगमध्ये सावकार डॉक्टर लक्ष्मण जाधव हा फटाले यांच्याकडे पैशांची विचारणा करतो. त्यांचा संवाद खालीलप्रमाणे

सावकार – फटाले, पैसे कधी देणार ?

फटाले – काल बडोदा बँकेचा इश्यू होता. थोड्या वेळात टाकून देतो.

सावकार – आता मी तुझ्या घरी येतो. बँकेचा इश्यू होता ना, तुला आता इश्यू दाखवतो तू ये.. ( पुढे शिवीगाळ केली) तुझ्या बापाला घेऊन ये, नाहीतर मी आलो तुझ्या घरापाशी थांब.. अशाप्रकारे धमकावत सावकरा त्यांच्याशी बोलला.

दुसरं कॉल रेकॉर्डिंग

सावकार – काल मी तुला वडिलांना घेऊन यायला सांगितलं होतं ना.

फटाले – सर येतो, आठ साडेआठ वाजेपर्यंत येतो.

सावकार – पैसे किती टाकलेत ?

फटाले – दीड हजार रुपये..

सावकार – त्या दिवशीचे शंभर रुपये राहिले आहेत ना..

फटाले – माहिती आहेत, ते पण टाकतो..

सावकार – वडिलांना घेऊन ये..

तिसरं कॉल रेकॉर्डिंग

सावकार – लक्ष्मण जाधव हा म्हणतो किती पैसे टाकले ?

फटाले – पंधराशे रुपये टाकले आणि बाकीचे पैसे कालच टाकायला सांगितले होते.

सावकार – कोणाला टाकायला सांगितले होते ?

फटाले – मित्राला टाकायला सांगितले होते.

सावकार – कधी सांगितले होते टाकायला ?

फटाले – रात्रीच मी पैसे टाकले की लगेच

सावकार – असले धंदे करू नका बरं का.. नाहीतर घरी यावं लागेल मला.

फटाले – यायची गरज नाही.. सावकार – टाका लवकर पैसे.. पाच मिनिटात पैसे आले पाहिजेत.. तारीख माहीत असते सगळं माहीत असतं घुमवता उग.. त्याच्यापाशी मोबाईल आहे आणि याच्यापाशी मोबाईल आहे.. किती वेळ लागेल अजून ?

फटाले – फोन लावतो सर.

सावकार – फोन नका लावू पैसे किती वेळात येणार ?

कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?.
महायुतीत तिढा कायम,सामंत मध्यस्थीसाठी पुण्यात;शिवसेनेचा स्वबळाचा इशारा
महायुतीत तिढा कायम,सामंत मध्यस्थीसाठी पुण्यात;शिवसेनेचा स्वबळाचा इशारा.
दोन भावांची युती अन् मनोमिलन झालंय, 100 टक्के... राऊतांचं मोठं वक्तव्य
दोन भावांची युती अन् मनोमिलन झालंय, 100 टक्के... राऊतांचं मोठं वक्तव्य.
सिंदखेडराजा नगरपरिषदेत 21वर्षीय सौरभ तायडे विजयी, कमी वयाचा नगराध्यक्ष
सिंदखेडराजा नगरपरिषदेत 21वर्षीय सौरभ तायडे विजयी, कमी वयाचा नगराध्यक्ष.
मशालीला आईस्क्रीम कोनासारखं फेकलं...भाजपची टीका, राऊतांचं उत्तर काय?
मशालीला आईस्क्रीम कोनासारखं फेकलं...भाजपची टीका, राऊतांचं उत्तर काय?.
कल्याणमध्ये राजकीय भूंकप, भाजप अन् शिंदे सेनेला मोठा हादरा; एकनिष्ठ...
कल्याणमध्ये राजकीय भूंकप, भाजप अन् शिंदे सेनेला मोठा हादरा; एकनिष्ठ....
हे विजयी कसे झाले? महायुतीच्या विजयानंतर 'समाना'तून जोरदार टीकास्त्र
हे विजयी कसे झाले? महायुतीच्या विजयानंतर 'समाना'तून जोरदार टीकास्त्र.
...म्हणून गप्प होतो, पण आता ती वेळ आलीये, नितेश राणेंचा रोख कुणाकडे?
...म्हणून गप्प होतो, पण आता ती वेळ आलीये, नितेश राणेंचा रोख कुणाकडे?.
जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका... राज ठाकरे यांच्याकडून सूचना
जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका... राज ठाकरे यांच्याकडून सूचना.