अॅपवर गुंतवणूक, डॉलरमध्ये ट्रान्सफर आणि मग हवाला, ‘असा’ झाला चायनीज स्कँडलचा पर्दाफाश

| Updated on: Oct 13, 2022 | 9:25 PM

मनी चेंजर्स आणि फॉरेक्स एक्स्चेंजने पैसे बदलण्याच्या क्रियाकल्पांबाबत आरबीआयने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे वारंवार उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे.

अॅपवर गुंतवणूक, डॉलरमध्ये ट्रान्सफर आणि मग हवाला, असा झाला चायनीज स्कँडलचा पर्दाफाश
हैदराबादमध्ये चायनीज स्कँडलचा पर्दाफाश
Image Credit source: tv9
Follow us on

हैदराबाद : सायबर गुन्हेगारीसोबतच आर्थिक अफरातफरीच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. असेच एक फसवणूक प्रकरण हैदराबादमध्ये (Fraud in Hyderabad) उघडकीस आले आहे. तब्बल 903 कोटींच्या चायनीज इन्व्हेस्टमेंट फ्रॉड स्कँडलचा (Chinese Investment Fraud Scandal) हैदराबाद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या फसवणूक प्रकरणी चिनी नागरिकांसह 10 जणांना पोलिसांनी अटक (Accused Arrested including Chinese Citizens) केली आहे. आरोपी लोकांकडून अॅपद्वारे गुंतवणूक करायचे आणि नंतर डॉलरमध्ये कन्वर्ट करुन परदेशात पाठवायचे.

असा झाला खुलासा

हैदराबादमधील एका नागरिकाने गुंतवणूक अॅपद्वारे 1.6 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलीस तपासात देवाण-घेवाण आणि कायद्याच्या उल्लंघन केल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहे.

तपासादरम्यान या व्यक्तीचे पैसे एका खाजगी कंपनीच्या खाजगी बँक अकाऊंटमध्ये जमा करण्यात आले होते. आरोपी अशा प्रकारे अॅपद्वारे केलेली गुंतवणूक डॉलरमध्ये कन्वर्ट करुन परदेशात पाठवायचे.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने एका चिनी व्यक्तीच्या सांगण्यावरुन बँक अकाऊंट उघडले आणि त्याच्या इंटरनेट बँकिंगचा युजर नेम आणि पासवर्ड चिनी इसमाला दिला.

बँक अकाऊंट उघडून देणाऱ्या व्यक्तींना प्रति अकाऊंट 1.2 रुपये द्यायचे

याशिवाय दिल्लीत राहणाऱ्या इसमाने एका प्रायव्हेट बँकेत अकाऊंट उघडले आणि मागील फर्मसोबत फोन नंबर शेअर केला. बँक अकाऊंट उघडून देणाऱ्या दोन व्यक्तींना प्रति अकाऊंट 1.2 लाख रुपये कमिशन मिळाले.

आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन

मनी चेंजर्स आणि फॉरेक्स एक्स्चेंजने पैसे बदलण्याच्या क्रियाकल्पांबाबत आरबीआयने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे वारंवार उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. खासगी कंपनीच्या 38 व्हर्च्युअल बँक खात्यांमधून मोठी रक्कम दोन मनी एक्सचेंज कंपन्यांकडे गेली. भारतीय चलनात मिळालेले रुपये अमेरिकन डॉलरमध्ये रूपांतरित केले जातात.

हवालाच्या माध्यमातून 903 कोटींची फसवणूक झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या स्कँडलमध्ये मुख्य आरोपी असलेल्या दोन व्यक्ती चीनमध्ये आहेत. फसवणूक प्रकरणी पोलिसांनी गंभीर पावले उचलली असून या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस ईडी आणि डीआरआय एजन्सींचीही मदत घेत आहेत.