मुलगा क्रिकेट स्पर्धेसाठी गेला, नराधमांचा त्याच्या आईवर डोळा! चिपळुणातील थरारक हत्याकांड

| Updated on: Nov 01, 2022 | 3:51 PM

चिपळूण हादरलं! आई फोन का उचलला जात नाही, इथपासून सुरु झालेली शंका ते हत्याकांडाचा खळबळजनक खुलासा

मुलगा क्रिकेट स्पर्धेसाठी गेला, नराधमांचा त्याच्या आईवर डोळा! चिपळुणातील थरारक हत्याकांड
थरारक हत्याकांड
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील पेठमाप इथं एका महिलेली निर्घृण हत्या (Chiplun Murder News) करण्यात आली. ऍसिड (Acid Attack) सदृश्य द्रव्य टाकून या महिलेला जाळून टाकण्यात आल्याचं पोलिसांच्या (Chiplun Crime News) तपासातून समोर आलंय. विशेष म्हणजे हत्येच्या वेळी महिलेच्या घरात कुणीही नव्हतं. मृत महिलेचा मुलगा क्रिकेट स्पर्धेसाठी बाहेर गेला होता. पण जेव्हा मुलाने आईला फोन करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आईने फोन न उचलल्यानं ही खळबळजनक घटना समोर आली.

हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव कुलसूम अन्सारी आहे. ही महिला पोफळी सय्यदवादी इथं राहायला होती. या महिलेच्या चेहऱ्यावर एसिड टाकल्यानंतर जशा जखमा होतात, तशा जखमा आढळून आल्यात. त्यामुळे खळबळ उडालीय. नेमकं या महिलेच्या हत्येचं कारण काय, अशी शंका घेतली जातेय.

मृत महिला आपल्या मुलासोबत पेठमाप इथं राहत होती. सोमवारी तिचा मुलगा क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरी इथं गेला होता. त्यावेळी हे खळबळजनक हत्याकांड घडलं.

हे सुद्धा वाचा

मृत महिलेचा मुलगा हा आपल्या आईला मोबाईल फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण आई फोन उचलत नव्हती. अखेर मुलाने आपल्या मित्रांना घरी जाण्यास सांगितलं.

ज्यावेळी मित्र घरी पोहोचले तेव्हा घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेलं होतं. यावेळी घाबरलेल्या मित्रांनी शेजाऱ्यांना बोलावून गेतलं. तेव्हा घरात. एका बाजूला कुलसूम अन्सारी यांचा मृतदेह झाकून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आला होता.

पोलिसांना तत्काळ या घटनेबाबत कळवण्यात आलं. पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. महिलेचा मृतदेह ताब्यात घेत तो पोस्टमॉर्टेमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला. तर आज या महिलेवर दफनविधी पोफळी सय्यदवाडी येथील ब्रस्थानात करण्यात आला.

सध्या पोलीस या हत्याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. या महिलेच्या हत्येनं खळबळ उडालीय. चिपळूण पोलिसांसमोर या महिलेच्या हत्येचा छडा लावण्याचं आव्हान सध्या उभं टाकलं आहे. चोरीच्या हेतूने या महिलेची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. आता प्राथमिक तपासातून नेमकी काय माहिती या हत्येप्रकरणी समोर येते, हे पाहणं महत्त्वाचंय.