हे कसले मायबाय? सेकंड हँड कार खरेदी करण्यासाठी पोटच्या गोळ्याला विकलं!

एका दाम्पत्यानं आपल्या अवघ्या तीन महिन्याच्या चिमुकल्याला एका व्यापाऱ्याला विकल्याची घटना घडलीय, ते ही चक्क कार खरेदी करण्यासाठी!

हे कसले मायबाय? सेकंड हँड कार खरेदी करण्यासाठी पोटच्या गोळ्याला विकलं!
| Updated on: May 14, 2021 | 2:59 PM

कानपूर : उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये मानवतेला आणि मायबापाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडलीय. एका दाम्पत्यानं आपल्या अवघ्या तीन महिन्याच्या चिमुकल्याला एका व्यापाऱ्याला विकल्याची घटना घडलीय, ते ही चक्क कार खरेदी करण्यासाठी! या आई-बापाने आपल्या पोटच्या गोळ्याचा व्यवहार दीड लाख रुपयात केलाय. या प्रकरणी त्या चिमुकल्याच्या आजोबा-आजीने तिवरा पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली आहे. (The couple sold their 3-month-old baby to buy a car)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी दाम्पत्यानं तीन महिन्यापूर्वी एका बाळाला जन्म दिला. दाखल तक्रारीनुसार चिमुकल्याच्या आजोबा-आजीने आपली मुलगी आणि तिच्या पतीनं कार खरेदी करण्यासाठी चिमुकल्याला गुरसहायगंजमधील एका व्यापाराऱ्याला दीड लाख रुपयात विकले आहे. तो चिमुकल्या अजून व्यापाऱ्याकडे आहे. संपूर्ण प्रकरण ऐकल्यानंतर पोलीसह चक्रावून गेले. त्यांनी तातडीने गावात जाऊन घटनेची चौकशी केली. ही घटना गुरुवारी आजोबा-आजीने पोलिसांशी संपर्क केल्यानंतर आणि आपली मुलगी आणि जावयाविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर उजेडात आलीय. या प्रकारामुळे सर्व गावकरी हैराण झाले आहेत.

8 दिवस कुणालाही थांगपत्ता नाही!

दोन दिवसांपूर्वी चिमकुल्याच्या आजीने जेव्हा आपल्या मुलीला फोन केला, तेव्हा मुलीचं गोंधळलेलं उत्तर ऐकून आजीला शंका आली. त्यांनी गावात जाऊन आपली मुलगी आणि जावयाकडे चौकशी केली. तेव्हा गुरसहायगंजमधील एका व्यापाऱ्याला दीड लाख रुपयात चिमुकल्याला विकल्याचं त्यांनी सांगितलं. आरोपी दाम्पत्याने आपल्या 3 महिन्याच्या चिमुकल्याला विकून एक सेकंड हँड कारही खरेदी केली. त्याबाबत त्यांनी 8 दिवस कुणालाही याचा थांगपत्ता लागू दिला नव्हता.

चिमुकल्याच्या आजीने आपली मुलगी आणि जावयावर कडक कारवाईची मागणी केलीय. पोलिसांनीही याबाबत चौकशी सुरु असून, योग्य ती कारवाई केली जाईल, असा विश्वास त्या आजीला दिला आहे.

इतर बातम्या :

‘जामतारा’ वेब सिरिज पाहून मुंबईच्या टोळीने प्लॅन आखला, लोणावळ्यात बसून अमेरिकेतील नागरिकांची लूट

ऑक्सिजनसाठी सेक्सची मागणी; कोरोनाग्रस्त पित्याचे प्राण वाचवण्यासाठी हतबल तरुणीचा शेजाऱ्याकडून गैरफायदा

The couple sold their 3-month-old baby to buy a car