India-Pakistan War : पुढच्यावर्षी 2026 मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध होईल का? अमेरिकेचा मोठा दावा
India-Pakistan War : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांना टार्गेट केलं. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला. भारताने या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं.

भारत-पाकिस्तानमध्ये वर्ष 2025 च्या मे महिन्यात संघर्ष झाला होता. चार दिवसातच दोन्ही देशांमध्ये सीजफायर झालं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं होतं. आता भारत-पाकिस्तान संदर्भात अमेरिकेतली एक मोठी थिंक टँक काउंसिल ऑन फॉरेन रिलेशन्सने (CFR) मोठा दावा केला आहे. वर्ष 2026 मध्ये पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध होऊ शकतं. CFR रिपोर्टनुसार, कॉन्फ्लिक्ट्स टू वॉच इन 2026 मध्ये काश्मीरमध्ये दहशतवादी घटना वाढल्यास दोन्ही देशांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. याआधी सुद्धा पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांमुळे दोन्ही देशांमध्ये संघर्षाची स्थिती उदभवली आहे. संस्थेच्या लेटेस्ट रिपोर्टमधून वॉर्निंग देण्यात आली आहे. पुढच्यावर्षी भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध होऊ शकतं.
CFR चा रिपोर्ट अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाच्या एक्सपर्टच्या सर्वेवर आधारित आहे. यात माजी राजदूत, सैन्य अधिकारी, प्रोफेसर आणि धोरणा तज्ज्ञांचा समावेश आहे. सध्या भारत-पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये सीजफायर आहे.
थिंक टँकच्या रिपोर्टमध्ये अजून काय म्हटलय?
अमेरिकी थिंक टँकच्या रिपोर्टमध्ये अगदी स्पष्टपणे म्हटलय की, जर भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध झालं, तर त्याचा थेट परिणाम अमेरिकेवर होईल. अलीकडे इनपुट समोर आलेले की, जम्मू-काश्मीरमध्ये 30 पेक्षा जास्त दहशतवादी लपले आहेत.
पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये युद्ध होणार का?
रिपोर्टमध्ये भारत-पाकिस्तान शिवाय दुसऱ्या धोक्याबद्दल सुद्धा भाष्य करण्यात आलं आहे. CFR नुसार, 2026 मध्ये पाकिस्तान आणि अफगानिस्तानमध्ये सशस्त्र संघर्षाची शक्यता आहे. अमेरिकी हितावर त्याचा कमी परिणाम होईल असं म्हटलं आहे.
23 पाकिस्तानी सैनिक ठार
ऑक्टोंबर महिन्यात अफगाण तालिबान आणि पाकिस्तानमध्ये सशस्त्र संघर्ष झाला. सीमेवर पाकिस्तानी सैन्य आणि अफगाणी तालिबानमध्ये हिंसक झडपा झाल्या. यात 200 पेक्षा जास्त तालिबानी आणि काही दहशतवादी मारले गेले. 23 पाकिस्तानी सैनिक ठार झाले.
अनेक दहशतवादी आणि त्यांचे लीडर मारले गेले
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांना टार्गेट केलं. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला. भारताने या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं. भारताच्या कारवाईत सीमापार अनेक दहशतवादी आणि त्यांचे लीडर मारले गेले. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये सशस्त्र संघर्ष झाला. काही दिवसातच सीजफायर सुद्धा झालं.
