AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India-Pak Truce : डोनाल्ड ट्रम्पनंतर आता चीनचाही खोटेपणा, भारत -पाकिस्तानबद्दल तो दावा; भारताने थेट फाडला बुरखा ..

China's India-Pak Truce Claim : अनेक जागतिक संघर्षात चीनने मध्यस्थाची भूमिका बजावली, असा दावा चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केला होता. भारत-पाकिस्तान युद्धाचा उल्लेखही त्यांनी केला. मात्र त्यावर आता भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

India-Pak Truce : डोनाल्ड ट्रम्पनंतर आता चीनचाही खोटेपणा, भारत -पाकिस्तानबद्दल तो दावा;   भारताने थेट फाडला बुरखा ..
चीनच्या दाव्यापर भारताचं चोख प्रत्युत्तर Image Credit source: social media
| Updated on: Dec 31, 2025 | 2:39 PM
Share

पहलगाम हल्ला, त्यानंतर झालेलं ऑपरेशन सिंदूर (Operation Sindeoor) आणि भारत-पाकिस्तान (India- Pakistan) दरम्यान झालेली युद्धबंदी यावरून आत्तापर्यंत बरंच काही बोललं गेलं आहे. त्यावरून झालेल्या राजकारणानेही तीव्र वळण घेतलं होतं. आधी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी युद्धबंधीचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला होता. भारत-पाकिस्तान दरम्यान शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपणच मध्यस्थी केली, यात मोठी , महत्वाची भूमिका केली अशा एक ना अनेक वल्गना ट्रम्प यांनी केल्या होत्या. मात्र भारताने त्यांच्यासमोर न झुकता ट्रम्पचे दावे थेट फेटाळून लावले आणि हा केवळ दोन्ही देशांमधील मुद्दा असल्याचे थेट स्पष्ट केलं होतं. कोणत्याही स्तरावर कोणत्याच तिसऱ्या देशाची काहीही भूमिका नव्हती आणि ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने स्वतः भारताकडून युद्धबंदीची मागणी केली होती असंही भारतातर्फे ठणकावून सांगण्यात आलं होतं.

चीनच्या विधानानंतर भारतातर्फे स्पष्टीकरण

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याचा पुनरुच्चार करत आता चीननेही यात उडी मारली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील शांतता चर्चेचा मध्यस्थ म्हणून आपण काम केल्याचा दावा चीनने केला असून आता भारताने पुन्हा आपली बाजू स्पष्ट केली आहे. भारत-पाकिस्तान संघर्षासह अनेक जागतिक संघर्ष सोडवण्यात बीजिंगने भूमिका बजावली आहे असं चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी अलिकडेच एका निवेदनात म्हटलं होतं.

भारताची भूमिका नेहमी स्पष्ट

मध्यस्थीबाबत भारताची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिली आहे असं सरकारी सूत्रांनी सांगितल्याची माहिती समोर आली आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर कोणतीही मध्यस्थी झाली नाही. भारत आणि पाकिस्तान दरम्यान तिसऱ्या पक्षाच्या किंवा तिसऱ्या देशाच्या हस्तक्षेपाला जागा नाही याचा भारताने पुनरुच्चार केला. युद्धबंदीसाठी पाकिस्ताननेच भारताच्या डीजीएमओशी संपर्क साधला होता असंही स्पष्ट करण्यात आलं.

चीनने काय केला दावा ?

बीजिंगमध्ये एका परिसंवादाला संबोधित करताना चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी म्हणाले की, या वर्षी जगात अनेक स्थानिक युद्धे आणि सीमापार संघर्ष झाले. चीनने म्यानमार, इराणचा अणुप्रश्न, भारत-पाकिस्तान तणाव, पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्ष आणि कंबोडिया-थायलंड वाद यासारख्या बाबींमध्ये मध्यस्थी केली असा दावा त्यांनी यावेळी केला. मात्र भारताने हे दावे साफ फेटाळून लावले आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत निवेदन

13 मे 2025 रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत, परराष्ट्र मंत्रालयाने हे स्पष्टपणे सांगितलं होतं की, दोन्ही देशांच्या डीजीएमओंमधील चर्चेत युद्धबंदीची तारीख, वेळ आणि संज्ञा निश्चित करण्यात आली होती. या प्रक्रियेत इतर कोणत्याही देशाची भूमिका नसल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केलं होतं.

धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट.
उमेदवारीसाठी दादांकडे 5, शिंदेंकडे 10 कोटी घेतात, राऊतांचा गंभीर आरोप
उमेदवारीसाठी दादांकडे 5, शिंदेंकडे 10 कोटी घेतात, राऊतांचा गंभीर आरोप.
मुंबईत उत्तर भारतीय महापौर! BJPच्या बड्या नेत्यानं ठाकरे बंधूंना डिवचल
मुंबईत उत्तर भारतीय महापौर! BJPच्या बड्या नेत्यानं ठाकरे बंधूंना डिवचल.
अर्ज दाखल लढती फिक्स.. 11 ठिकाणी युती.. तर 18 महापालिकेत आमने-सामने
अर्ज दाखल लढती फिक्स.. 11 ठिकाणी युती.. तर 18 महापालिकेत आमने-सामने.