आरोपींनी गाडीवर लाल दिवा बसवून अनेक ठिकाणी टाकल्या धाडी, नंतर समजलं की..

आरोपी नदीमशाह दिवाण हा स्वतः ला एनसीबीचा उपसंचालक असल्याचं सांगत होता. त्याने स्वतः च्या कारगाडीवर भारत सरकार तसेच एनसीबी उपसंचालक अशी पाटी लावलेली आहे.

आरोपींनी गाडीवर लाल दिवा बसवून अनेक ठिकाणी टाकल्या धाडी, नंतर समजलं की..
akola police
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Mar 25, 2023 | 1:13 PM

कृष्णा सोनारवाडकर, मुंबई : एनसीबीचे (NCB) तोतया अधिकारी बनून फिरणाऱ्या चौघांना अटक पोलिसांनी (Maharashtra police) सापळा रचून अटक केली आहे. अकोला पोलिसांनी (Akola Police) चौघांना अटक केल्याची माहिती मिळाली आहे. एनसीबीचे अधिकारी सांगून लोकांकडून कारवाईची धमकी देत खंडणी वसूल करीत असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन चौघांना अटक केली आहे. मुंबई एनसीबी कार्यालयात वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करत असल्याचं सांगत आरोपी फिरत होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आरोपी नदीमशाह दिवाण हा स्वतः ला एनसीबीचा उपसंचालक असल्याचं सांगत होता. त्याने स्वतः च्या कारगाडीवर भारत सरकार तसेच एनसीबी उपसंचालक अशी पाटी लावलेली आहे. गाडीवर आरोपींनी चक्क लाल दिवा बसवून अनेक ठिकाणी खोट्या धाडी टाकल्या आहेत. अकोला पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, तोतया पोलिस असल्याचे निदर्शनास आले. अकोला पोलिसांनी अधिक माहितीसाठी मुंबई एनसीबी कार्यालयात संपर्क साधला असता, अशा नावाचे कोणीही अधिकारी नसल्याचं एनसीबीने स्पष्ट सांगितलं आहे.

अकोल्यातील दहीहंडा पोलीसानी आरोपीना बेड्या ठोकल्या आहेत. अटक आरोपींमध्ये नदीमशाह दिवाण, ऐयाझ शेख, असिफ शाह आणि मोहीम शेख यांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपीकडून अनेक बनावट शिक्के, खोटी कागदपत्र, बनावट ओळखपत्र आणि इतर मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपी वापरत असलेली कारगाडीही पोलिसांनी जप्त केली आहे.

पोलिसांनी आतापर्यंत अशा तोतया पोलिसांना अनेकदा अटक केली आहे. तरी सुध्दा अशा पद्धतीचे गुन्हे उघडकीस येत आहेत. अनेकदा पोलिस असल्याचे सांगून वयोवृद्ध लोकांना लुटल्याच्या घटना घडल्या आहेत.