नोटांच्या बंडलचा डीपीला फोटो, भावपूर्ण श्रद्धांजलीचा स्टेटस; मग तरुणासोबत नेमके काय घडले?

| Updated on: Mar 21, 2023 | 5:08 PM

डीपीवरील फोटो आणि व्हॉट्सअपवरील स्टेटस पाहून मित्रांनी तरुणाच्या नातेवाईकांना फोन केला. मित्रांच्या फोननंतर नातेवाईक तरुणाला बघायला गेले तर समोरील दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली.

नोटांच्या बंडलचा डीपीला फोटो, भावपूर्ण श्रद्धांजलीचा स्टेटस; मग तरुणासोबत नेमके काय घडले?
अज्ञात कारणातून तरुणाचा मृत्यू
Image Credit source: TV9
Follow us on

सांगली / शंकर देवकुळे : सांगलीतील वाळवा येथे एक धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. बाराबिगा वसाहतीत आज सकाळी एका तरुणाने अज्ञात कारणातून आपली जीवनयात्राच संपवल्याची घटना घडली. डीपीवर नोटांच्या बंडलचा फोटो आणि व्हॉट्सअपला भावपूर्ण श्रद्धांजलीचा स्टेटस ठेवून तरुणाने जीवन संपवले. योगेश सचिन फाळके असे मयत तरुणाचे नाव आहे. योगेशच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांसह मित्रांनाही धक्का बसला आहे. योगेशने हे पाऊन का उचलले हे तपासाअंती स्पष्ट होईल. आष्टा पोलिसात याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे.

डीपीवर नोटांचा फोटो आणि व्हॉट्सअपला भावपूर्ण श्रद्धांजलीचा मॅसेज

वाळव्याच्या बाराबागी वसाहतीमध्ये राहणाऱ्या योगेश फाळके हा फळ विक्रीचा व्यवसाय करत होता. योगेशने रात्री दोनच्या सुमारास भावपूर्ण श्रद्धांजलीचा स्टेटस व्हिडीओ बनवला आणि तो व्हाटसअप स्टेटसवर ठेवला. तसेच नोटांच्या बंडलाचे फोटो डीपीवर ठेवला होता. सदरचे स्टेटस आणि डीपी पाहिल्यावर सकाळी त्याच्या मित्रांनी नातेवाईकांशी संपर्क साधला.

आष्टा पोलिसांकडून अधिक तपास सुरु

मित्रांच्या फोननंतर नातेवाईकांनी जाऊन पाहिले असता योगेश मृतावस्थेत आढळला. योगेश कोणत्या कारणातून टोकाचे पाऊल उचलले हे अद्याप कळले नाही. घटनेची माहिती मिळताच आष्टा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याबाबत आष्टा पोलीस सखोल तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

साताऱ्यात दोन मित्रांनी जीवनयात्रा संपवली

अज्ञात कारणातून दोन मित्रांनी जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील कोरेगावमध्ये घडली आहे. कोरेगाव येथील अनन्या रेसिडेन्सीमध्ये ही घटना घडली. ऋषिकेश ताटे आणि सुभाषकुमार प्रसाद अशी मयत तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी कोरेगाव पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे कोरेगावसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.