Delhi Sahil Case | अल्पवयीन मुलीवर चाकूने वार करणाऱ्या साहिलने अखेर सांगितलं खरं कारण; “तिला प्रवीणसोबत..”

दिल्लीत हत्येचा भीषण प्रकार घडत असताना लोक तिथून जात आहेत, भीतीयुक्त नजरेनं पाहत आहेत पण आरोपीला थांबवण्यासाठी काही करत नाहीत, असं सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या घटनेच्या व्हिडीओत दिसत आहे. मुलीच्या हत्येनंतर साहिल तिथून पळून गेला.

Delhi Sahil Case | अल्पवयीन मुलीवर चाकूने वार करणाऱ्या साहिलने अखेर सांगितलं खरं कारण; तिला प्रवीणसोबत..
Delhi Sahil Case
Image Credit source: Twitter
| Updated on: Jun 01, 2023 | 11:15 AM

नवी दिल्ली : दिल्लीच्या शाहबाद डेअरी भागात सोळा वर्षांच्या एका मुलीचा अनेक लोकांच्या डोळ्यांदेखत चाकूने वार करून आणि नंतर डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची भीषण घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला. साहिल या 20 वर्षांच्या आरोपीने रविवारी रात्री एका वर्दळीच्या गल्लीत या मुलीच्या डोक्यात दगड घालण्यापूर्वी तिला वीसहून अधिक वेळा भोसकलं. तो फ्रीज आणि एसी मेकॅनिक म्हणून काम करतो. त्याला उत्तर प्रदेशातील बुलंदशहर इथून अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांसमोर चौकशीदरम्यान साहिलीने गर्लफ्रेंडला मारण्यामागचं खरं कारण सांगितलं.

“एक्स बॉयफ्रेंड प्रवीण जैन याच्यासोबत साक्षीला पॅचअप करायचं होतं. प्रवीणकडे मोटरसायकल आहे म्हणून तिला त्याच्याकडे परत जायचं होतं. माझ्याशी ब्रेकअप केल्यानंतर तिला त्याच्याकडे परत जायचं होतं, म्हणून संतापाच्या भरात मी तिचा खून केला”, अशी कबुली साहिलने दिल्ली पोलिसांसमोर दिली.

पीडित मुलीच्या हातातवर ‘प्रवीण’ नावाचा एक टॅटूसुद्धा होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. प्रवीण हा वीस वर्षांचा तरुण असून तो सध्या उत्तर प्रदेशातील जौनपूर इथं राहतो. प्रवीणला दिल्ली पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं आहे. संतापाच्या भरात गर्लफ्रेंडची हत्या केल्याचं जरी साहिलने सांगितलं असलं तरी तिच्याशी ब्रेकअप झाल्याच्या सात दिवसांनंतर आणि हत्येच्या 15 दिवस आधीच त्याने चाकू खरेदी केला होता. साहिलला दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून सध्या पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे.

दिल्लीत हत्येचा भीषण प्रकार घडत असताना लोक तिथून जात आहेत, भीतीयुक्त नजरेनं पाहत आहेत पण आरोपीला थांबवण्यासाठी काही करत नाहीत, असं सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या घटनेच्या व्हिडीओत दिसत आहे. मुलीच्या हत्येनंतर साहिल तिथून पळून गेला. साहिल आणि ही मुलगी यांची मैत्री होती, मात्र शनिवारी त्यांचं भांडणं झालं होतं. रविवारी या मुलाने तिच्या मैत्रिणीच्या मुलाच्या वाढदिवसाला जाण्याचं ठरवलं होतं. मात्र रविवारी रात्री ती रस्त्यावरून जात असताना आरोपीने तिला अडवलं आणि अनेकवेळा भोसकलं. यानंतर त्याने तिच्या डोक्यात अनेकदा दगडही घातला, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.