दिल्लीत माजी केंद्रीय मंत्र्यांच्या पत्नीची हत्या, उशीने तोंड दाबून जीव घेतला

| Updated on: Jul 07, 2021 | 8:29 AM

चोरीच्या उद्देशाने धोब्याने माजी केंद्रीय मंत्री पी रंगराजन कुमारमंगलम यांच्या पत्नीची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

दिल्लीत माजी केंद्रीय मंत्र्यांच्या पत्नीची हत्या, उशीने तोंड दाबून जीव घेतला
दिल्ली पोलीस - प्रातिनिधिक फोटो
Follow us on

नवी दिल्ली : दिल्लीतील वसंत विहार भागात माजी केंद्रीय मंत्री पी आर कुमारमंगलम (P R Kumarmangalam) यांच्या पत्नीची हत्या (Former Cabinet Minister’s Wife Murder) करण्यात आली आहे. 67 वर्षीय किटी मंगलम यांची उशीने तोंड दाबून हत्या करण्यात आली. घरातील धोबी आणि त्याच्या दोघा साथीदारांनी हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपी राजूला (Washerman Arrested) अटक केली आहे. (Delhi Vasant Vihar Murder Former Cabinet Minister P R Kumarmangalam Wife Kitty killed in house washer man arrested)

चोरीच्या उद्देशाने हत्या

चोरीच्या उद्देशाने धोब्याने माजी केंद्रीय मंत्री पी रंगराजन कुमारमंगलम यांच्या पत्नीची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वसंत विहार भागातील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर त्या राहत होत्या. घटनेच्या वेळी किटी कुमारमंगललम (Kiti Kumarmangalam) आणि त्यांची मोलकरीण या दोघीच घरात होत्या.

दरवाजाची बेल वाजवून धोबी घरात आला. त्याच्या पाठोपाठ आणखी दोघे जण घरात शिरले. त्यानंतर आरोपींनी मोलकरणीला एका खोलीत बंद केलं. घरात दरोडा टाकल्यानंतर किटी कुमारमंगललम यांची उशीने तोंड दाबून हत्या करण्यात आली. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. मोलकरणीने त्यांच्या धोब्याची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली.

कोण होत्या किटी कुमारमंगलम

किटी कुमारमंगलम यांनी सुप्रीम कोर्टात वकील म्हणूनही काम केलं आहे. त्यांचा मुलगा काँग्रेस नेता आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तो बंगळुरुहून दिल्लीला आला. त्यांचे पती पीआर कुमारमंगलम हे पीव्ही नरसिंहराव सरकारमध्ये मंत्री होते. नंतर ते भाजपमध्ये दाखल झाले. वाजपेयी सरकारमध्ये ते ऊर्जामंत्री देखील होते. कर्करोगाने त्यांचे निधन झाले.

संबंधित बातम्या :

तुझ्याशी लग्न करतो, तुझ्या भावाची लष्कर भरती करतो, 57 जणींना गंडवणारा ‘दादला’ पुण्यात अटकेत

बंदुकीच्या धाकावर दागिन्यांसह 4 लाख लुटले, पोलिसांनी 12 तासाच्या आत आवळल्या मुसक्या

(Delhi Vasant Vihar Murder Former Cabinet Minister P R Kumarmangalam Wife Kitty killed in house washer man arrested)