Dombivali Blast : डोंबिवलीत गॅस गळती होऊन भीषण स्फोट, तीन जण गंभीर जखमी

| Updated on: Aug 23, 2022 | 10:05 PM

पारसनाथ को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या तळमजल्यावर राहणाऱ्या 65 वर्षीय मनिषा मोरवेकर आपल्या पतीसह राहतात. आज संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरात भीषण स्फोट झाला.

Dombivali Blast : डोंबिवलीत गॅस गळती होऊन भीषण स्फोट, तीन जण गंभीर जखमी
डोंबिवलीत गॅस गळती होऊन भीषण स्फोट
Image Credit source: TV9
Follow us on

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेकडील गायकवाड वाडीतील पारसनाथ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या तळमजल्यावरील घरात गॅस गळती (Gas Leakage) होऊन भीषण स्फोट (Blast) झाल्याची घटना घडली आहे. या भीषण स्फोटात तीन जण गंभीर जखमी (Injured) झाले आहेत. मनिषा मोरवेकर, उर्सुला लोढाया आणि त्यांचा चार वर्षाचा मुलगा रेयांश लोढाया अशी जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला ? याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र या दुर्घटनेत मोर्वेकर यांच्या घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

गॅस गळतीमुळे वीजेचे बटण दाबताच स्फोट झाला

पारसनाथ को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या तळमजल्यावर राहणाऱ्या 65 वर्षीय मनिषा मोरवेकर आपल्या पतीसह राहतात. आज संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरात भीषण स्फोट झाला. नेमक्या याच वेळी दुर्दैवाने उर्सुला आपला मुलगा रियांश याला क्लासवरून घरी घेऊन येत होत्या. इमारतीच्या जिन्याने वरच्या मजल्यावर जाण्यासाठी आई आणि मुलगा मोर्वेकर यांच्या दारासमोरुन जात होत्या. नेमके त्याचवेळी तळमजल्यावर राहणाऱ्या मोरवेकर यांनी आपला घराचा दरवाजा उघडत दिवा लावण्यासाठी विजेचे बटण दाबले. यावेळी घरात सिलेंडरमधून गॅस गळती झाल्याने मोठा स्फोट झाला. मोरवेकर यांच्यासह त्यांच्या दारासमोरुन जात असलेल्या उर्सुला आणि त्यांचा मुलगा हे तिघेही गंभीर जखमी झाले. अग्नीशमन दलाला याची तात्काळ माहिती देण्यात आली. महिती मिळताच अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेत परिसरातील विद्युत पुरवठा बंद केला. त्यानंतर बचाव कार्य हाती घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. (Due to gas leak in Dombivali, a huge explosion in a building, three people were seriously injured)

हे सुद्धा वाचा