Bhandara : यात्रेतून साडे पाच लाखांची रक्कम सोन्याच्या दागिने चोरट्यांनी पळविले, घटनास्थळी दाखल झालेले पोलिस सुध्दा भांबावले, मग…

| Updated on: Jan 19, 2023 | 8:12 AM

यात्रेत चोरी झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली, घटनास्थळी गर्दी झाली, व्यवसायिकाची अवस्था पाहून लोकांना घाम फुटला

Bhandara : यात्रेतून साडे पाच लाखांची रक्कम सोन्याच्या दागिने चोरट्यांनी पळविले, घटनास्थळी दाखल झालेले पोलिस सुध्दा भांबावले, मग...
व्यवसायिकाची अवस्था पाहून लोकांना घाम फुटला
Image Credit source: tv9marathi
Follow us on

भंडारा – दुर्गाबाई डोह यात्रेतून (Durgabai Doh yatra) साडेपाच लाख रक्कमेसह सोन्याच्या दागिने चोरट्यांनी पळविल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील कुंभली येथील दुर्गाबाईच्या डोह यात्रेत घडली. ज्यावेळी चोरी झाल्याची बातमी सगळीकडे व्हायरल झाली, त्यावेळी घटनास्थळी बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. व्यवसायिकाची अवस्था पाहून लोकं इमोशनल झाली होती. याप्रकरणी साकोली ठाण्यात (Sakoli Police Station)तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे तीन दिवसांची कमाईवर चोरट्याने डल्ला मारल्याची माहिती पोलिसांनी जाहीर केली आहे.

आकाश पाळणाच्या कापडी तंबूतून रोख 5 लाख 50 हजार रुपये आणि सोन्याचे दागिने लोखंडी पेटीतील अज्ञात चोरट्याने पळवून नेले. घटना भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील कुंभली येथील दुर्गाबाईच्या डोह यात्रेत घडली आहे. याप्रकरणी साकोली ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

पवनी तालुक्यातील अड्याळ येथील रेझिना रफीक खान (35) दरवर्षी कुंभली येथील यात्रेत आकाश झुला लावतात. यावर्षीही त्यांनी या यात्रेत आकाशझुला लावला आहे. आकाश झुल्यालगतच कापडी तंबू लावून तिथं राहण्याची व्यवस्था असते. यात्रेत तीन दिवसाची 5 लाख 55 हजार रुपयांची कमाई झाली होती. या रोख रकमेसह पतीच्या सोन्याच्या तीन अंगठ्या एका लोखंडी पेटीत ठेवल्या होत्या. सकाळी लोखंडी पेटी त्यांना दिसून आली नाही. या घटनेची माहिती साकोली पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी घटना स्थळ गाठले तेव्हा पेटीचे कलप उघडले दिसून आले, या पेटीत 50 हजारांच्या नोटा दिसून आल्या. मात्र त्यातील पाच लाख रोख आणि सोन्याचे दागिने आढळून आले नाही. यात्रेतून झालेली तीन दिवसांची कमाई चोरीस गेल्याने महिला व्यावसायिकावर आभाळ कोसळले आहे.