AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OBC Creamy Layer: ‘पालकांचे वेतन एकमेव निकष नाही’, ओबीसी क्रिमिलेयर प्रकरणी ‘सुप्रीम’ निर्णय काय?

Supreme Court OBC Creamy Layer: ओबीसी क्रिमिलेयर प्रकरणात सुप्रीम निर्णय येऊन धडकला आहे. या निर्णयाचे दूरगामी परिणाम होणार आहे. 2004 मधील केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या काही उमेदवारांसंदर्भातील हा निर्णय काय आहे?

OBC Creamy Layer: 'पालकांचे वेतन एकमेव निकष नाही', ओबीसी क्रिमिलेयर प्रकरणी 'सुप्रीम' निर्णय काय?
सुप्रीम कोर्टImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 13, 2026 | 9:53 AM
Share

Supreme Court OBC Creamy Layer: ओबीसी आरक्षणातील क्रिमिलेयर ठरवताना केवळ पालकांचे वेतन अथवा पगार हा एकमेव निकष ठरू शकत नाही असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. घटनात्मक आरक्षणा धोरणाचा हवाला देत सुप्रीम कोर्टाने वेतनाच्या आधारावर उमेदवाराला सरसकट क्रिमिलेअर लाभ देणे अयोग्य ठरवले. या निर्णयामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्या. आर. महादेवन आणि न्या. पी. एस. नरसिंहा यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.

कृषी उत्पन्न परीघा बाहेर

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी नॉन क्रिमिलेयर निश्चित करण्यासाठी काही महत्त्वाचे बदल करण्याचा ऐतिहासिक निकाल 11 मार्च रोजी दिला. त्यानुसार, क्रिमिलेयरचा निर्णय हा केवळ आई-वडिलांच्या वेतनावर निर्धारीत करता येणार नाही. तर 1993 मूळ निर्देशानुसार, पद आणि इतर घटकही लक्षात घेणे आवश्यक आहे. जर आई-वडील सरकारी नोकरीत सी अथवा डी श्रेणीत (क्लास III या IV) असतील तर त्यांचे वेतन क्रिमिलेयर निश्चित करण्यासाठी जोडले जाऊ शकत नाही. कृषीचे उत्पन्न या परीघाबाहेर ठेवणे अत्यावश्यक आहे. क्रिमिलेअर निश्चित करण्यासाठी केवळ इतर स्त्रोतामधून (व्यवसाय, मालमत्ता, किराया इत्यादी) कुटुंबाची एकूण सलग तीन वर्षांतील सरासरी उत्पन्न 8 लाख रुपये प्रति वर्षांपेक्षा कमी असावे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

हे धोरण भेदभाव करणारे

या निकालात न्यायालयाने 2004 मधील केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या त्या पत्रातील परिच्छेद 9 अमान्य केला. त्यात बँक, खासगी क्षेत्र वा सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे वेतन हे क्रिमिलेयरमध्ये जोडण्यास सांगण्यात आले होते. कोर्टाने हे तत्व भेदभाव करणारे असल्याचा निर्वाळा दिला. सरकारी कर्मचाऱ्यांचे मुलं आणि खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची मुलं असा भेदभाव करणे व्यवहार्य होणार नाही. जोपर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील आणि खासगी क्षेत्रातील पद हे सरकारी क्लास III या IV समकक्ष मानले जात नाही, तोपर्यंत 1993 मधील मूळ आदेश कायम असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार