भारताचे प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराज सिंह, रॉबिन उथप्पाला ED ने दिला झटका

भारताचे दोन प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराज सिंह आणि रॉबिन उथप्पा यांना ED ने झटका दिला आहे. भारताचं अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात या दोघांनी प्रतिनिधीत्व केलय.

भारताचे प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराज सिंह, रॉबिन उथप्पाला ED ने दिला झटका
Yuvraj Sing-Robin uthappa
| Updated on: Sep 16, 2025 | 1:21 PM

ऑनलाइन बेटिंग App प्रकरणात भारताचे माजी क्रिकेटपटू युवराज सिंह आणि रॉबिन उथप्पा यांना हजर होण्यास सांगितलं आहे. प्रवर्तन निर्देशालय म्हणजे ED ने दोघांना नोटिस पाठवून चौकशीसाठी बोलावलं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, ED ने 22 सप्टेंबर रोजी उथप्पाला चौकशीसाठी बोलावलं आहे, तर 23 सप्टेंबरला युवराज सिंहला बोलावलं आहे. दोन्ही क्रिकेटपटुंची चौकशी दिल्ली स्थित ED च्या हेडक्वार्टरमध्ये होईल. या दोन भारतीय क्रिकेटपटूंशिवाय अभिनेता सोनू सूदची सुद्धा 23 सप्टेंबरला ED कडून चौकशी होणार आहे.

आता प्रश्न हा आहे की, ED रॉबिन उथप्पा आणि युवराज सिंहची कुठल्या प्रकरणात चौकशी करणार आहे?. भारताच्या या दोन्ही माजी क्रिकेटपटुंची ऑनलाइन बेटिंग ऐप प्रकरणात चौकशी होईल. या प्रकरणात ED समक्ष हजर होणारे क्रिकेटपटू फक्त युवराज आणि उथप्पा नाहीय, तर याआधी सुरेश रैना आणि शिखर धवनला सुद्धा हजर झाले होते. ED कडून भारतीय क्रिकेटर्सच्या चौकशीच हे प्रकरण बेटिंग App 1xBet शी संबंधित आहे.

ऑनलाइन सट्टेबाजी प्लेटफॉर्म्स विरोधात चौकशीला वेग

प्रवर्तन निर्देशालय ED ने मागच्या काही काळापासून ऑनलाइन सट्टेबाजी प्लेटफॉर्म्स विरोधात चौकशी वेगाने सुरु केलीय. या प्रकरणात ED ची चौकशी धन शोधन निवारण अधिनियम यानी PMLA अंतर्गत सुरु आहे.

ED काय विचारणार?

प्रवर्तन निदेशालय म्हणजे ED युवराज आणि उथप्पाला 1xBet सोबतच्या त्यांच्या संबंधांबद्दल विचारु शकते. त्यांचा कंपनीसोबत कशा प्रकारचा करार होता? त्यांना किती पैसे मिळाले? या सर्व मुद्यांवर प्रश्न-उत्तर होऊ शकतात.

App 70 भाषांमध्ये उपलब्ध

ED ची ही चौकशी कथित ऑनलाइन बेटिंग App शी संबंधित आहे. यात कोट्यवधि रुपयांची फसवणूक आणि मोठ्या प्रमाणात टॅक्स चोरीचा आरोप आहे. कंपनीनुसार, 1xBet बेटिंग APP ला बिझनेसमध्ये 18 वर्षांचा अनुभव आहे. हे जागतिक स्तराच सट्टेबाजी App आहे. कंपनीची वेबसाइट आणि एप 70 भाषांमध्ये उपलब्ध आहे. तिथे ग्राहक हजारो क्रीडा स्पर्धांसाठी सट्टा लावू शकतात.