65 व्या वर्षी बाशिंग बांधण्याची स्वप्न पाहत होता वृद्ध, मॅट्रीमोनियल साईटवर नवरीही शोधली; पण…

| Updated on: Feb 13, 2023 | 5:19 PM

पीडित वृद्धाने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या पत्नीचे निधन झाले आहे. त्यामुळे वयाच्या 65 व्या वर्षी त्यांना एकटेपणा जाणवत होता. त्यामुळे त्यांनी मॅट्रिमोनियल साईटवर त्यांचे अकाउंट तयार केले. दरम्यान, एक महिला त्यांच्या संपर्कात आली.

65 व्या वर्षी बाशिंग बांधण्याची स्वप्न पाहत होता वृद्ध, मॅट्रीमोनियल साईटवर नवरीही शोधली; पण...
मॅट्रीमोनियल साईटवर तरुणीची फसवणूक
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : मॅट्रीमोनियल साईटवर जोडीदार शोधणे एका वृ्द्ध व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. मॅट्रीमोनियल साईटवर ओळख झालेल्या महिलेने वृद्धाला तब्बल 60 लाखांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वृद्धाने पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचच्या सायबर सेलने गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी महिलेचा मोबाईल क्रमांक आणि बँक खात्याच्या आधारे या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आरोपी महिला मॅट्रिमोनियल साइटद्वारे पीडितेच्या संपर्कात आली होती. त्यामुळे पोलिसांनी मॅट्रिमोनिअल साईटकडूनही आरोपी महिलेबाबत जबाब मागवला आहे.

मॅट्रीमोनियल साईटवर महिला आली संपर्कात

पीडित वृद्धाने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या पत्नीचे निधन झाले आहे. त्यामुळे वयाच्या 65 व्या वर्षी त्यांना एकटेपणा जाणवत होता. त्यामुळे त्यांनी मॅट्रिमोनियल साईटवर त्यांचे अकाउंट तयार केले. दरम्यान, एक महिला त्यांच्या संपर्कात आली.

काही दिवस या साईटवर चॅटिंग केल्यानंतर दोघांनीही एकमेकांना आपले मोबाईल आणि व्हॉट्सअॅप नंबर दिले. यानंतर जेव्हाही संधी मिळेल तेव्हा ते फोनवर चॅट करायचे. दोघेही एकमेकांशी लग्न करण्यास तयार होते.

हे सुद्धा वाचा

आरोपी महिलेने वृद्धाचा अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केला

अनेक वेळा त्यांनी व्हिडिओ कॉलवर महिलेसोबत सेक्स चॅटही केले होते. यादरम्यान आरोपी महिलेने एक दिवस गुपचूप त्यांचा अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा आरोप आहे.

आरोपी महिलेने आधी त्यांना त्यांचे अश्लील व्हिडिओ पाठवले. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. एवढेच नाही तर आरोपी महिलेने त्यांना सांगितले की, तिने त्यांच्या मोबाईलमधील सर्व कॉन्टॅक्ट कॉपी केले आहेत.

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पैसे उकळले

या सर्व कॉन्टॅक्ट्सनाही ती हा व्हिडिओ पाठवणार आहे. अशा प्रकारे आरोपी महिलेने धमक्या देऊन दोन महिन्यात 60 लाख रुपये उकळले. पीडित वृद्धाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी महिलेचा मोबाईल क्रमांकावर पाळत ठेवली आहे. मात्र सध्या आरोपी महिलेचा मोबाईल बंद आहे.

ज्या खात्यात पैसे जमा केले आहेत, त्याचा तपशील काढून आरोपी महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पोलिसांनी मॅट्रिमोनियल साईट कंपनीकडून महिलेच्या खात्याबाबत तपशीलही मागवला आहे. विशेषत: महिलेला ती ज्या संगणकावरून या वेबसाइटवर लॉगिन करत होती त्याचा आयपी पत्ता देण्यास सांगितले आहे.

पीडिताने आरोपी महिलेला 60 लाख रुपये दिले होते. मात्र तरीही ती दोन लाखांची मागणी करत होती. ही रक्कम न दिल्यास व्हिडिओ सार्वजनिक करू, अशी धमकी देत ​​होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लवकरच आरोपी महिला आणि तिच्या नेटवर्कचा पर्दाफाश होईल.