हे बेबी… मला तुझ्याशी लग्न करायचंय… एलॉन मस्कचं मुंबईतील महिलेला लग्नाचं प्रपोजल? त्यानंतर जे घडलं… ही चूक तुम्ही करू नका!

सोशल मीडियावर वाढत्या फसवणुकीचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. चेंबूरमधील एका महिलेला बनावट एलॉन मस्कने लग्नाचे आमिष दाखवून 16.34 लाखांना गंडवले. खऱ्या एलॉन मस्कऐवजी सायबर गुन्हेगाराने ओळख चोरून महिलेला प्रेमजाळ्यात ओढले आणि व्हिसा प्रक्रियेच्या नावाखाली फसवणूक केली. सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, सोशल मीडिया वापरताना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

हे बेबी... मला तुझ्याशी लग्न करायचंय... एलॉन मस्कचं मुंबईतील महिलेला लग्नाचं प्रपोजल? त्यानंतर जे घडलं... ही चूक तुम्ही करू नका!
एलॉन मस्कचं मुंबईतील महिलेला लग्नाचं प्रपोजल?
| Updated on: Jan 24, 2026 | 1:22 PM

जगात सर्वात डेंजर काय आहे माहीत आहे का? नाही ना? जगात सर्वात डेंजर काय असेल तर ते म्हणजे सोशल मीडिया. या सोशल मीडियामुळे काय होऊ शकत नाही? एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. अफवांचा बाजार उठल्यावर एखाद्या देशात उठाव होऊ शकतो, एखाद्याच्या हातातील निवडणूक जाऊ शकते तर एखाद्याला कोट्यवधी रुपयांचा फटकाही बसू शकतो. गेल्या काही वर्षातील घटनांवरून हे पुन्हा पुन्हा सिद्ध झालं आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर कसा करता त्यावर बरंच अवलंबून आहे. तसेच तुम्ही सोशल मीडियावर आलेल्या कंटेटवर किती विश्वास ठेवता यावरही सर्व काही अवलंबून आहे. हे सर्व रामायण सांगायचं कारण म्हणजे. एका चेंबूरच्या महिलेला थेट एलॉन मस्कने लग्नाची मागणी घातली. त्यामुळे ही महिलाही हुरळून गेली. त्यानंतर जे झालं, त्या धक्क्यातून ही महिला अजूनही बाहेर पडलेली नाहीये. काय घडलं असं त्या महिलेच्या बाबत?

चेंबूर येथे ही 40 वर्षीय महिला राहते. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले उद्योजक एलॉन मस्कच्या ही महिला संपर्कात आली. मुळात समोरचा व्यक्ती एलॉन मस्क नव्हताच. एका व्यक्तीने या महिलेला आपण एलॉन मस्क असल्याची बतावणी केली. त्या महिलेला खरंही वाटलं. या कथित एलॉन मस्कने रोज तिच्याशी चॅटिंग सुरू केली. तिला विश्वासात घेतलं. मोठमोठी स्वप्ने दाखवली. या महिलेलाही आपण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या संपर्कात आल्याचं वाटू लागलं. ही महिला पूर्णपणे कह्यात आल्यानंतर या कथित एलॉन मस्कने तिला थेट लग्नाची मागणीच घातली.

प्रेमाचे वादे…

तू माझ्याशी लग्न करशील का? आपण दोघे लग्न करू. दोघेही अमेरिकेत राहू, असं त्याने तिला सांगितलं. तुला आरामदायी आयुष्य जगता येईल, तू सर्व सोडून ये, असं या कथित एलॉन मस्कने सांगितलं. असा अनपेक्षितपणे लग्नाचा प्रस्ताव आल्यानंतर ही महिलाही बहकून गेली. तिलाही वाटलं एलॉन मस्कशी लग्न केल्यावर आपलं नशिब पालटेल. पण लवकरच तिचा भ्रमनिरास झाला. ही प्रेम कहाणी फसवणुकीत बदलेल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं.

अशी झाली फसवणूक

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून या व्यक्तीने महिलेशी संपर्क साधला होता. तिला लग्नाचा प्रस्ताव दिल्यानंतर त्याने या महिलेला अमेरिकेत येण्याचा आग्रह धरला. ही महिलाही घरदार सर्व सोडून अमेरिकेत जायला तयार झाली. तिने अमेरिकेत जाण्याची तयारीही सुरू केली. यावेळी त्याने तिला एक मेसेजिंग ॲप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगितले. त्यावर त्याने तिच्याशी बऱ्याच गप्पा मारल्या. अमेरिकेत जाण्याची स्वप्ने दाखवली. त्यानंतर तिला व्हिसा प्रक्रिया पूर्ण करण्याच्या नावाखाली ॲमेझोनवरून गिफ्ट कार्ड खरेदी करण्यास सांगितलं. या गिफ्ट्स कार्डचे कोड आणि तिकीटाच्या नावाखाली त्याने या महिलेची फसवणूक केली. त्याने या महिलेची 16.34 लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.