AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

tv9 Marathi Special Report | अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली! भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू

tv9 Marathi Special Report | अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली! भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू

| Updated on: Jan 24, 2026 | 11:41 AM
Share

अकोला महापालिकेत आकड्यांचा खेळ फसला आहे. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात भाजप विरोधात सर्व विरोधकांना एकवटण्याचे प्रयत्न सुरु केलेत, मात्र आकड्यांची स्थिती रंजक बनल्यामुळे एक नगरसेवक देखील साऱ्या सत्तेची गणितं बदलू शकतो अशी स्थिती सध्या अकोल्यात ओढावली आहे.

अकोला महापालिकेत आकड्यांचा खेळ फसला आहे. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात भाजप विरोधात सर्व विरोधकांना एकवटण्याचे प्रयत्न सुरु केलेत, मात्र आकड्यांची स्थिती रंजक बनल्यामुळे एक नगरसेवक देखील साऱ्या सत्तेची गणितं बदलू शकतो अशी स्थिती सध्या अकोल्यात ओढावली आहे. आंबेडकरांच्या सहाय्याने सारे विरोधक भाजप विरोधात एकवटले आहेत मात्र तरी सुद्धा अपक्षांच्या साथीशिवाय विरोधकांच्या सत्तेचं गणित जुळत नाही आहे. एकूण ८० जागांच्या अकोला महापालिकेत ४१ जागा बहुमतासाठी गरजेच्या आहेत. भाजप ३८ आहे तर भाजपला बहुमतासाठी ३ जागांची गरज आहे. तर दुसरीकडे वंचितच्या नेतृत्वात साऱ्या विरोधकांची बैठक पार पडून त्यांच्याकडे २ अपक्ष अद्याप न आल्यामुळे विरोधकांच्या एकजुटीचा एकदा ४० वर अडकला आहे यामुळे मोठी रंजक स्थिती निर्माण झाली आहे.

Published on: Jan 24, 2026 11:41 AM