
महाविकास आघाडी सरकारच्या विश्वासार्हतेची पार धुळधाण करणारे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकं पेरल्या प्रकरणात मोठी घडामोड झाली आहे. या प्रकरणात निवृत्त पोलिस अधिकारी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना जामीन देण्यास न्यायाल्याने सपशेल नकार दिला आहे. त्यामुळे प्रदीप शर्मा अडचणीत आले आहेत. ते सध्या जामीनावर बाहेर आहेत.त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग असला तरी पुढे काय होणार त्यांना पुन्हा अटक होणार का याकडे लक्ष लागले आहे.
25 फेब्रुवारी 2021 रोजी राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री म्हणून राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख असताना अँटिलिया स्फोटकं प्रकरण घडले होते. या प्रकरणात अनेक थरारक घडामोडी घडल्या होत्या.त्यानंतर राज्य सरकारची विश्वासार्हता पणाला लागली होती. त्यानंतर काही वर्षाने राज्यात सत्तातर घडले. या सत्तातरणास या प्रकरणाने मोठा हातभार लावला होता.
मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए कोर्टाचे न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी प्रदीप शर्मा यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटीलिया या निवासस्थानाच्या बाहेर महिंद्राच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये अचानक स्फोटकं सापडली होती. या स्फोटकांत २० जिलेटिनच्या कांड्या होत्या. या महिंद्रा स्कोर्पिओत अंबानी कुटुंबाला धमकी देणारी चिट्टी देखील सापडली होती. या प्रकरणात आणखीन एक आरोपी वादग्रस्त इन्सपेक्टर सचिन वाझे यांनी ही स्कोर्पिओ या ठिकाणी ठेवल्याचे सीसीटीव्हीत दिसले होते.
ठाण्यातील एक व्यापारी याची ही स्कोर्पिओ कार होती, त्याचा मृतदेह कळवा ठाणे येथील खाडीत सापडला होता. या प्रकरणात प्रदीप शर्मा यांना आरोपी केले आहे. शर्मा यांना १७ जून २०२१ रोजी अटक झाली होती. २३ ऑगस्ट २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने शर्मा यांना जामीन दिला होता. त्यामुळे ते सध्या जामीनावर मुक्त असून त्यांचा जामीन फेटाळल्याने त्यांना आता पुन्हा अटक होणार का याकडे लक्ष लागले आहे.