
एका भाजप खासदाराच्या बहिणीने आपल्या सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केला आहे. फर्रुखाबादचे भाजप खासदार मुकेश राजपूत यांची बहिण रीना सिंहने आपल्या सासरच्यांवर मारहाणीचा आरोप केलाय. त्यानंतर रीना सिंहने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केलीय. रीना सिंहने तक्रारीत आरोप केलाय की, दीर राजेश आणि सासरे लक्ष्मण सिंह यांनी जीवे मारण्याची धमकी दिलीय. इतकच नाही, सासरे आणि दीराने मिळून तिच्यावर हल्ला केला. तिला शिवीगाळ केली. दांड्याने मारहाण करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
रीना सिंह खासदार मुकेश राजपूत यांची बहिण आहे. तिने आरोप केला की, रविवारी दुपारी मी बाथरुममध्ये आंघोळ करत असताना सासरे आणि दीराने मिळून खिडकीतून माझा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मी, सासरे आणि दीराच्या या कृतीला विरोध केला, तेव्हा त्यांनी शिवीगाळ सुरु केली. मारहाण केली. सासऱ्यांनी काठीने मारलं. जीवे मारण्याची धमकी दिली.
लोखंडाच्या रॉडने मारहाण केली
सासरे लक्ष्मण सिंह यांनी आपली लायसन्स रिव्हॉलवर काढली. तुला गोळी मारेन अशी धमकी दिल्याचा दावा रीना सिंह यांनी केला आहे. रीना सिंह यांनी दीरावर धारदार चाकूने हल्ला केल्याचा आरोप केला. लोखंडाच्या रॉडने मारहाण केली. त्यानंतर रीनाच्या हाताला दुखापत झाली. रीना यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. या हल्ल्यानंतर सतत मला धमकी दिली जात आहे.
आपल्यासोबत दुर्व्यवहार
मुकेश राजपूत हे भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत. त्यांची बहिण रीना सिंह यांनी सासरच्यांवर मारहाणीचा आरोप करत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. आपल्यासोबत दुर्व्यवहार करण्यात आला. आपला शारीरिक आणि मानसिक छळ केला. या प्रकरणात सहावर पोलीस ठाण्याचे प्रभारी (एसएचओ) चमन गोस्वामी यांनी माहिती देताना सांगितलं की, मिळालेल्या तक्रारीच्या आधारावर लक्ष्मण सिंह, राजेश आणि गिरीश यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशी सुरु आहे. दोषींविरोधात कायद्यातंर्गत कठोर कारवाई केली जाईल.