तुटलेला साईड मिरर ठरला महत्वाचा दुआ, मुलाच्या मृत्यूस जबाबदार कारमालकाला बापाने अखेर असे शोधले

पोलीसांनी आरोपी सापडत नसल्याने फाईल बंद केली होती. परंतू व्यावसायिक जितेंद्र चौधरी यांनी दुर्घटनास्थळावरील सर्व कार सर्व्हीस सेंटरना गाडीचा तुटलेला साईड मिरर आणि धातूचे भाग दाखवले त्यानंतर असा सापडला कारचा मालक

तुटलेला साईड मिरर ठरला महत्वाचा दुआ, मुलाच्या मृत्यूस जबाबदार कारमालकाला बापाने अखेर असे शोधले
side mirror
Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Nov 09, 2023 | 6:28 PM

गुरुग्राम | 9 नोव्हेंबर 2023 : आठ वर्षांपूर्वी गुरुग्रामच्या सेक्टर 57 जवळील रेल्वे विहार जवळ दहावीचा विद्यार्थी अमित चौधरी याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. आपल्या काकांसोबत घरी चाललेल्या अमित याला एका अज्ञात वाहनचालकाने जोरदार ठक्कर मारली होती. रुग्णालयात त्याला नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 279 ( बेपर्वाईने गाडी चालविणे ), 304 अ ( सदोष मनुष्यवध ) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. परंतू चालकाची ओळख न पटल्याने पोलिसांनी फाईल बंद केली. अमितचे वडील जितेंद्र यांनी पोलिसांच्या पायऱ्या झिझवल्या परंतू त्यांना न्याय मिळाला नाही. अखेर दूर्घटना स्थळावरून गाडीचा तुटलेला साईड मिरर तसेच ऐमेटल मिळाले आणि प्रकरणाची दिशा बदलली.

वजीराबादचे व्यवसायिक जितेंद्र चौधरी यांनी दुर्घटनास्थळावरील सर्व कार सर्व्हीस सेंटरना गाडीचा तुटलेला साईड मिरर आणि धातूचे भाग दाखवले. कारची ओळख पटविण्यासाठी त्यांनी हे सर्व सोपस्कार केले. परंतू त्यांना काही यश मिळत नव्हते. शेवटी एका कार रिपेअर करणाऱ्याने त्यांना सांगितले की तो साईड मिरर मारुती सुझुकी स्विफ्ट वीडीआयचा आहे. त्यानंतर त्यांनी मारुती कंपनीशी संपर्क केला. त्यानंतर कारच्या आरशाच्या मागे छापलेल्या बॅच नंबरमुळे मालकाचा रजिस्ट्रेशन क्रमांक शोधण्यास सुरुवात झाली. परंतू मालकाचे नाव सांगितले नाही. नोंदणी क्रमांकांसह कारच्या पार्टचा तपास सुरुच असल्याचे म्हटले.

शेवटी निराश होऊन जितेंद्र चौधरी यांनी जानेवारी 2016 कोर्टात याचिका केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आकृती वर्मा यांनी तपास अधिकाऱ्याकडे अहवाल मागितला. पोलिसांनी आरोपी सापडला नसल्याचे सांगितले. परंतू चौधरींना काही समजले नाही. 27 जुलैला हा अहवाल स्वीकारला गेला. त्यानंतर त्यांनी एप्रिल 2018 मध्ये पुन्हा कोर्टात धाव घेतली. परंतू कोर्टाने याचिका विचारात घेतली नाही, परंतू तपासधिकाऱ्याकडे पुन्हा अर्ज करण्याचे आदेश दिले.

कोर्टाने पोलीसांना फटकारले

चौधरी यांनी जानेवारी 2023 पुन्हा कोर्टात धाव घेतली. यावेळी त्यांनी मुलाला ठोकरणाऱ्या वाहनाच्या मालकावर कारवाई करण्याची मागणी कोर्टाला केली. यावेळी न्यायाधीशांनी तक्रारदारदाराला नोटीस न देता अनट्रेस रिपोर्ट स्वीकारल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्यास सांगितले.कोर्टाच्या आदेशानंतरही योग्य सहकार्य न केल्याबद्दल कोर्टाने पुन्हा तपास अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अखेर पोलिसांना गेल्या आठवड्यात वाहन मालक ज्ञानचंद याच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले. अखेर चौधरी यांनी तपासाला झालेल्या विलंबानंतर अखेर आपल्या मुलाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्याला आरोपीला अटक होईल अशी आशा व्यक्त केली आहे.