
काही वर्षांपूर्वी रिलीज झालेला ‘गरम मसाला’ हा बॉलिवूड चित्रपट तुम्हाला आठवत असेलच. या चित्रपटात अक्षय कुमार एकाच वेळी तीन गर्लफ्रेंडसोबत फिरताना दिसतो. ती चित्रपटाची कहाणी होती, पण प्रत्यक्षातही असंच काहीस घडल्याची एक घटना समोर आली आहे. एक असा इसम ज्याने 1-2 नव्हे तर 3-3 लग्न केली. एवढंतच नव्हे तर तो तीनही पत्नींसोबत मजेत आयुष्य जगत होता, पण आश्चर्याची बाब म्हणजे त्याच्या कोणत्याच पत्नीला माहीत नव्हतं की आपल्या पतीच्या आणखी 2 पत्नी आहेत. अखेर 50 वर्षांच्या इसमाचे बिंग फुटलं, त्याचे खरे रंग अखेर उघड झाले आणि त्ायनंतर तीनही पत्नींनी त्याला लाथ मारून हाकलून दिलं.
खरंतर हे प्रकरण अमेरिकेतील फ्लोरिडा येथील आहे. हेन्री बेट्सी ज्युनियर नावाच्या एका व्यक्तीने तीन महिलांना मूर्ख बनवले आणि त्यांच्याशी कोर्ट मॅरेजही केलं. मनोरंजक गोष्ट म्हणजे कायदेशीररित्या लग्न करूनही त्याने केलेली फसवणूक पकडली गेली नाही.अनेक वर्ष तो त्याच्या 3 पत्नींसोबत वेगवेगळं आयुष्य जगत होता. अखेर त्यांचं बिंग फुटलं. गेल्या आठवड्यात त्याला अमेरिकन कोर्टाने दोषी ठरवलं.
कसं विणलं जाळं ?
हेन्री अनेकदा डेटिंग ॲप्सद्वारे घटस्फोटित अविवाहित महिलांची शिकार करत असे. संशय येऊ नये म्हणून तो त्यांच्याशी कोर्ट मॅरेज करायचा. नंतर, तो त्यांच्या पैशाचा आनंद घ्यायचा. नोव्हेंबर 2020 मध्ये, त्याने टोन्या नावाच्या महिलेशी पहिलं लग्न केलं. त्यानंतर 2 वर्षांनी, तो ब्रँडीला भेटला आणि तिच्याशी दुसऱ्या काउंटीमध्ये लग्न केले. काही महिन्यांनंतर, त्याने तिसरं लग्हीन केले. 23 नोव्हेंबर 2022 रोजी त्याने हर्नांडो काउंटीमध्ये मिशेल नावाच्या महिलेशी लग्न केले.
चौथी शिकारही शोधत होता
एवढेच नाही तर त्याने आणखी एका तरूणीला, मिशा एव्हरेटलाही डेट केले होते, पण तिला कदाचित त्याची चलाखी कळली असावी आणि ती पळून गेली, वाचली. तिने स्वतः सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबद्दल सांगितले. मिशाने सांगितले की ती त्याच्या प्रेमात कशी पडली.
Florida Man Who Was Married To Three Women At The Same Time Sentenced For Felony Bigamy. pic.twitter.com/sFRyMQMNH6
— Raphousetv (RHTV) (@raphousetv2) August 4, 2025
गुपित कसं फुटलं ?
हेन्री तीन बायकांसोबत खूप सहजपणे आयुष्य जगत होता. पण काउंटी रेकॉर्डमध्ये त्याचे नाव शोधण्याचा विचार त्याची पहिली पत्नी टोन्याच्या मनात आला. नंतर जे सत्य बाहेर आले ते ऐकून टोन्या हादरलीच. दुसऱ्या काउंटीमध्ये त्याच्या दुसऱ्या महिलेशी लग्नाचा रेकॉर्ड समोर आला. त्यानंतर आणखी एक रेकॉर्ड सापडला. टोन्याने सोशल मीडियावर या महिलांचा शोध घेतला आणि त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांना किती मोठा भावनिक विश्वासघात सहन करावा लागला आहे हे लवकरच त्या तिघींनाही कळलं. म्हणून त्या तिघींनी त्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.
गेल्या आठवड्यात न्यायालयाने हेन्रीला दोषी ठरवले होते, परंतु कायद्याच्या दृष्टीने त्याचा गुन्हा इतका मोठा नव्हता की त्याला तुरुंगात ठेवावे. त्याला 2वर्षांची प्रोबेशन आणि सामुदायिक सेवेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हेन्रीने खुल्या न्यायालयात त्याच्या तीन पत्नी आणि कुटुंबाची माफीही मागितली. मात्र, त्याची नवीन प्रेयसीही न्यायालयात उपस्थित होती. त्याची तिसरी पत्नी मिशेल देखील प्रशासनावर संतापली आहे. तिच्या मते, असे लोक कायद्यातील त्रुटींचा फायदा घेतात.