Goa Crime: प्रेमाला नकार दिला म्हणून प्राध्यापिकेचा गळा आवळून खून; सावंतवाडीच्या माजी उपनगराध्यक्षाचा मुलाला गोव्यातून अटक

| Updated on: Jun 25, 2022 | 12:10 AM

गौरव हा ओल्ड गोवा येथे एका जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करत होता. त्या दरम्यान ओल्ड गोवा येथील खाडोळा कॉलेजमध्ये असणाऱ्या प्राध्यापिका गौरी बरोबर त्याची ओळख झाली होती. त्या ओळखीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले होते. मात्र काही दिवसानंतर गौरीने त्याच्यासोबत न राहण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे गौरव प्रचंड नैराश्येत गेला होता.

Goa Crime: प्रेमाला नकार दिला म्हणून प्राध्यापिकेचा गळा आवळून खून; सावंतवाडीच्या माजी उपनगराध्यक्षाचा मुलाला गोव्यातून अटक
प्रेम नाकारले म्हणून प्राध्यापिकेचा खून
Image Credit source: facebook
Follow us on

सावंतवाडी : प्राध्यापिका (Professor Girl Murder) असलेल्या मुलीच्या प्रेमात पडलेल्या जीम ट्रेनरने (Gym trainer) आपल्या प्रेमाला नकार दिला म्हणून प्रा. गौरी आचार्य हिचा गळा आवळून खून केल्याची घटना ओल्ड गोवा (Old Goa) येथे घडली. या खून प्रकरणी सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्षाचा मुलगा गौरव प्रकाश बिद्रेला गोव्यात अटक करण्यात आली आहे. गुरूवारी रात्री तिचा खून करण्यात आला असून शुक्रवारी त्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी गौरवने आपणच गौरीचा गळा आवळून खून केल्याचे कबूल केले आहे. तो गौरीचा जीम ट्रेनर म्हणून काम करीत होता. त्यातूनच त्यांची ओळख झाली होती.

गौरव हा ओल्ड गोवा येथे एका जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करत होता. त्या दरम्यान ओल्ड गोवा येथील खाडोळा कॉलेजमध्ये असणाऱ्या प्राध्यापिका गौरी बरोबर त्याची ओळख झाली होती. त्या ओळखीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले होते. मात्र काही दिवसानंतर गौरीने त्याच्यासोबत न राहण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे गौरव प्रचंड नैराश्येत गेला होता.

प्रेमसंबंध बिनसल्यानंतर वाद

गौरव आणि गौरीचे प्रेमसंबंध बिनसल्यानंतर त्यांच्यामध्ये वाद झाले होते, त्यानंतर गुरूवारी दुपारी गौरी बेपत्ता झाली असल्याची तक्रार गौरीच्या आईने पोलिसात दिली होती. त्यानंतर पोलिसांकडून गौरीचे मोबाईल लोकेशन तसेच शेवटी ती कोणाला भेटली होती, तिचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत या सगळ्यांची माहिती पोलिसांनी घेतली होती. त्यानंतर शुक्रवारी तेथील जीम ट्रेनर गौरव बिद्रेचे याप्रकरणी नाव पुढे आले. त्यानंतर त्याची पोलीसांकडून कसून चौकशी केली असता गौरवने आपणच खून केल्याची कबुली पोलिसांना दिली.

गौरववर आधीही विनयभंगाचा खून

याप्रकरणी आता पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला तेथील न्यायालयात हजर करण्यात आले असून अधिक तपास गोवा पोलीस करीत आहेत. याप्रकरणी गौरव हा यापूर्वी मुंबईत मॉडेल म्हणून काम करत होता, त्या ठिकाणीही अनेक कलाकारांना व उच्चभ्रू लोकांना त्याने जिम ट्रेनिंग दिले होते. त्या काळात मुंबई येथे एका महिलेने त्याच्यावर विनयभंगाची तक्रार दाखल केली होती.

जामीनावर बाहेर

या प्रकरणातून तो जामिनावर बाहेर असल्याचेही पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी गौरवला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहेत. मूळचा सावंतवाडीचा असलेला गौरव हा काही काळ मुंबईत कामानिमित्त होता.त्यानंतर तो गोव्यात वास्तव्य करत होता.चांगल्या कुटुंबातील मुलगा अशी त्यांची ओळख होती.मात्र काल घडलेल्या घटनेनंतर सावंतवाडीत खळबळ माजली आहे.