एक्स बॉयफ्रेंडला बेडरुममध्ये बोलावलं, संबंध सुरू असतानाच मागून नवीन प्रियकर आला, मग…

31 जानेवारीला सानियाने भेटण्याच्या बहाण्याने संजीवला तिथे बोलावलं. संजीव त्याचा मित्र दीपकसोबत तिथे आला होता. सोनिया संजीवला एकट्याला तिच्या खोलीत घेऊन गेली.

एक्स बॉयफ्रेंडला बेडरुममध्ये बोलावलं, संबंध सुरू असतानाच मागून नवीन प्रियकर आला, मग...
Affair
| Updated on: Feb 03, 2026 | 9:37 AM

उत्तर प्रदेश मुजफ्फरनगर येथील नई मंडी कोतवाली क्षेत्रात 1 फेब्रुवारीला सरवट फाटकाजवळ नाल्यात एका युवकाचा मृतदेह मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली. मृतकाची ओळख पटली आहे. संजीव उर्फ जीवन असं त्याचं नाव आहे. पुरकाजी क्षेत्र हरिनगरचा तो निवासी आहे. एसएसपी संजय कुमार वर्मा यांनी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन चार जणांची टीम बनवली. सत्य समोर आल्यानंतर सगळेच हैराण झाले.संजीवचे सोनिया नावाच्या महिलसोबत मागच्या 12 वर्षापासून प्रेमसंबंध होते असं पोलीस चौकशीत समोर आलय. सोनिया बऱ्याचदा संजीवच्या गावी यायची. त्याचवेळी सोनियाची सादिक नावाच्या युवकासोबत जवळीक वाढली. संजीवला हे नातं मान्य नव्हतं. तो सोनियाला सोडायला तयार नव्हता. सादिकला संजीवचा हस्तक्षेप अजिबात मान्य नव्हता.

सादिक आणि सोनियाने मिळून संजीवला रस्त्यातून हटवण्याची योजना बनवली. प्लानिंगनुसार सादिकने सोनियाला सरवट भागात एक भाड्याचं घर घेऊन दिलं. 31 जानेवारीला सानियाने भेटण्याच्या बहाण्याने संजीवला तिथे बोलावलं. संजीव त्याचा मित्र दीपकसोबत तिथे आला होता. सोनिया संजीवला एकट्याला तिच्या खोलीत घेऊन गेली.

जोरात हात-पाय मारले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया आणि संजीव यांचे बेडरुममध्ये शारीरिक संबंध सुरु असताना सादिक तिथे आला. त्याने तिथे संजीवच्या गळ्यात रशी अडकवली आणि गळा आवळला. संजीवने त्याचे प्राण वाचवण्यासाठी जोरात हात-पाय मारले. पण सोनियाने संजीवचे हात पकडून ठेवले. जेणेकरुन त्याला विरोध करता येऊ नये. श्वास कोंडल्यामुळे संजीवचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर दोघांनी मृतदेह चादरीत गुंडाळून जवळच्या नाल्यात फेकला व तिथून पसार झाले.

Follow Us