ही आई नाही हैवान! पोटच्या मुलीवर बॉयफ्रेंडला बलात्कार करायला लावला, नंतर इतकं भयानक केलं की…

एका मातेने आई-मुलीच्या पवित्र नात्याला कलंक लावला आहे. या आईच कृत्य समजल्यानंतर पोलीसही हादरुन गेले आहेत. एक महिला आपल्या पोटच्या मुलीसोबत असं कंस वागू शकते, हाच सर्वांना प्रश्न पडला आहे.

ही आई नाही हैवान! पोटच्या मुलीवर बॉयफ्रेंडला बलात्कार करायला लावला, नंतर इतकं भयानक केलं की...
Crime News
| Updated on: May 28, 2025 | 1:27 PM

आई-मुलीच नातं विश्वासाच, प्रेमाचं, काळजीचं, आपुलकीच असतं. कुठल्याही मुलीला आपल्या आईजवळ सुरक्षित वाटतं. पण एक आई याला अपवाद ठरली आहे. तिने या पवित्र नात्याला कलंक लावला आहे. या आईने आपल्या प्रियकरासोबत मिळून गुन्ह्याची अशी कथा लिहिली की, पोलीसही त्यामुळे हैराण झालेत. हरियाणाच्या कैथल जिल्ह्यात 21 मे रोजी एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. ट्रकच्या धडकेत हा मृत्यू झाल्याच पोलीस मानत होते. पण पोलिसांनी आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा केला आहे. एका अधिकाऱ्यानुसार, बलात्कारानंतर मुलीची हत्या करण्यात आली.

21 मे रोजी कैथल जिल्ह्यात रादौर क्षेत्रात धौलरा गावाजवळ रस्ता क्रॉस करताना एका अल्पवयीन मुलीचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याची पोलिसांना सूचना मिळाली. पोलिसांनी अज्ज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा नोंदवला. पुढे पोलिसांना समजलं की, किशोरीला ट्रकने धडक मारली नव्हती. मुलीच्या आईने आपल्या बॉयफ्रेंडला मुलीवर बलात्कार करायला लावला. त्यानंतर तिची हत्या केली.

ट्रक चालकाची मदत घेतली

हत्या केल्यानंतर दुर्घटनेच स्वरुप देण्यासाठी मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला. मृत्यूला दुर्घटना दाखवण्यासाठी ट्रक चालकाची मदत घेतली. मुलीच्या श्राद्धाच्या दिवशी आरोपी महिलेने स्वत:च पतीला सत्य काय ते सांगितलं. तिने सांगितलं की, मुलीचा मृत्यू रस्ते अपघातात झाला नव्हता. तिनेच तिच्या प्रियकराला मुलीवर बलात्कार करायला लावला. या दरम्यान मुलीला बेशुद्ध ठेवण्यासाठी दिलेल्या औषधाच्या ओव्हरडोसमुळे तिचा मृत्यू झाला.

पोस्टमार्टम रिपोर्टवरही प्रश्नचिन्ह

पत्नीची ही नीच हरकत ऐकून पती हैराण झाला. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. पोलिसांना हे समजल्यानंतर ते सुद्धा हैराण झाले. मृत मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मुलीची आई, तिची मैत्रीण रेखा, प्रियकर लाडी, त्याचा भाऊ रणजीत, शेजारी मिट्ठू, डॉक्टर राजेश आणि ड्रायव्हर रणजीत सरदार यांच्याविरुद्ध हत्या आणि पॉक्सोसह वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा नोंदवला. आरोपींना अटक केली. या संपूर्ण घटनेत पोस्टमार्टम रिपोर्टवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालय. औषधांच्या ओव्हरडोसबद्दल पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये का नाही समजल?.