नवा मोबाइल घ्यायचा होता… ‘त्या’ कारणामुळे आई-वडील पैसे देत नव्हते…पण नंतर जे समोर आलं ते धक्कादायक होतं

नाशिकच्या सातपुर पोलीस ठाण्यात अक्षय खेताडे या 23 वर्षीय तरुणाच्या मृत्यू प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून सातपुर पोलीसांचे पथक अधिकचा तपास करीत आहे.

नवा मोबाइल घ्यायचा होता... त्या कारणामुळे आई-वडील पैसे देत नव्हते...पण नंतर जे समोर आलं ते धक्कादायक होतं
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Dec 10, 2022 | 3:48 PM

नाशिक : अलिकडच्या काही वर्षांमध्ये आई-वडिलांनी हट्ट पुरवला नाही की, मुलांनी टोकाचं पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे. अगदी क्षुल्लक कारणावरून आपलं जीवन संपविणाऱ्या घटना समोर येतात. पोटच्या मुलाची हौस पुरवली असती तर आज काळजाचा तुकडा डोळ्यासमोर असता अशीच काहीशी भावना निर्माण होत असेल, अशीच काहीशी भावना नाशिकमधील एका दाम्पत्यासमोर उभी राहिली आहे. सातपुर परिसरात राहणाऱ्या खेताडे कुटुंबातील 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. त्या आत्महत्ये मागील कारण समोर आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. नवीन मोबाइल घ्यायचा असल्याने अक्षय खेताडे हा 23 वर्षीय तरुण आई वडिलांकडे पैसे मागत होता. मुलाला मद्याची नशा करण्याची सवय असल्याचे पाहून आई-वडील पैसे देत नव्हते. त्याचाच राग अक्षय खेताडे या 23 वर्षीय तरुणाला आल्याने त्याने आत्महत्या केली आहे. आई-वडील घरात झोपल्याचे लक्षात येताच त्याने बाहेरून घराचा दरवाजा लावला आणि पाचव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली.

नाशिकच्या सातपुर पोलीस ठाण्यात अक्षय खेताडे या 23 वर्षीय तरुणाच्या मृत्यू प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून सातपुर पोलीसांचे पथक अधिकचा तपास करीत आहे.

सातपुरच्या अशोकनगर परिसरात ही घटना घडल्याने संपूर्ण सातपुर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. क्षुल्लक कारणावरून आपली जीवन यात्रा संपविल्याने पालक वर्गात खळबळ उडाली आहे.

आई-वडील मोबाइल घेण्यासाठी पैसे देत नसल्याचा त्याच्या मानत राग निर्माण झाला होता, वारंवार मोबाइल घेण्यासाठी पैसे मागत असल्याचे पोलीसांच्या तपासात समोर आले आहे.

नाशिक शहरात घडलेल्या या घटणेवरुन हळहळ व्यक्त केली जात असली तरी दुसरीकडे मुलांचा हट्ट न पुरवल्याने मुलांची मानसिकता थेट जीवन संपविन्यापर्यन्त जात असल्याने चिंतेची बाब निर्माण झाली आहे.