crime news : संशयावरून त्याने पत्नीची हत्या केली, पाण्याच्या टाकीत तुकडे लपवले

देशात आता एका पाठोपाठ महिलांचे अत्यंत निघृण पद्धतीने खून केल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. आता आणखी एकाने अत्यंत निर्दयी पत्नीची हत्या करीत तिचे तुकडे केले आहेत.

crime news :  संशयावरून त्याने पत्नीची हत्या केली, पाण्याच्या टाकीत तुकडे लपवले
arrest
Image Credit source: socialmedia
| Updated on: Mar 06, 2023 | 2:11 PM

छत्तीसगड : देशात आणखी एक निघृण पद्धतीने केलेले हत्याकांड उघडकीस आले आहे. पत्नीचा दुसऱ्या कोणाशी तरी संबंध असल्याच्या संशयातून एका पतीने अत्यंत क्रुर पद्धतीने खून करीत तिच्या शरीराचे तुकड पाण्याच्या टाकीत लपविल्याची घटना उघडकीस आली आहे.
देशात स्रीयांचे अत्यंत निघृण पद्धतीने खून केल्याचे प्रकार घडत आहेत. छत्तीसगढच्या बिलासपूर येथे ही अत्यंत थरकाप उडविणारी घटना उघडकीस आली आहे.

बिलासपुर येथील उसलापूर पोलीस ठाण्यात एका तरूणाने स्वत:च्या पत्नीवर संशय घेऊन तिची हत्या केली आणि गुन्हा लपविण्यासाठी तिच्या शरीराचे तुकडे करीत त्यांना प्लास्टीकने बांधले आणि आपल्या घराच्या टाकीत टाकले. पोलीसांनी या तरूणाच्या घरी छापा टाकला असता. तेव्हा पाण्याच्या टाकीत बॅग मिळाली त्यामध्ये हे शरीराचे तुकडे सापडले, त्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीची पोलीसांनी चौकशी केली असता त्याने तिच्यावर संशय असल्याने तिची हत्या केल्याची कबूली दिली आहे. आरोपीचे नाव पवन ठाकूर असून आरोपीच्या दुर्दैवी पत्नीचे नाव सीता साहू असे आहे.

असा झाला गुन्हा उघडकीस…

पोलिसांनी आरोपी पवन ठाकूर याला नकली नोटांसह अटक केली होती. याच प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिस आरोपीच्या घरी पोहचले तेव्हा घरातून प्रचंड दुर्गंधी येत होती. त्यामुळे पोलीसांनी शोध घेतला असता घराच्या पाण्याच्या टाकीत पोलिसांना प्लास्टीकच्या पिशवित आरोपीच्या मृतदेहाचे तुकडे लपविल्याचे आढळले. पोलिसांनी आरोपीच्या घरातून बनावट नोटांचे बड्डल आणि नोटा मोजण्याची मशिनही मिळाली आहे.

दोन मुलाचा बाप

आरोपी पवन ठाकूर हा दोन मुलांचा पिता आहे. तो त्याची पत्नी आणि मुलासह भाड्याच्या घरात रहात होता. त्याला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे त्याने तिची पाच जानेवारीला हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे करून टाकीत टाकले होते. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने त्याच्या दोन्ही मुलांना आपल्या आई- वडीलांकडे तखतपूरला पाठवून दिले असून या दोघांचा विवाह दहा वर्षांपूर्वी झाला होता अशी माहिती उघडकीस आली आहे.