विकृत नवरा, नात्याची मर्यादा विसरला, आपल्या दोन मित्रांनाच बायकोवर..हादरवून सोडणारं प्रकरण

विश्वास हा पती-पत्नीच्या नात्याचा पाया असतो. याच पायावर संसाराचा गाड चालतो. पण काहीवेळा पतीच या विश्वासाला तडा देतो. दोघांनाही परस्परांकडून काही अपेक्षा असते.

विकृत नवरा, नात्याची मर्यादा विसरला, आपल्या दोन मित्रांनाच बायकोवर..हादरवून सोडणारं प्रकरण
Crime News
| Updated on: Feb 07, 2026 | 4:14 PM

लग्नानंतर पतीच्या पत्नीकडून आणि पत्नीच्या पतीकडून काही अपेक्षा असतात. यात सन्मान, आदर, विश्वास याची दोघांनाही परस्परांकडून अपेक्षा असते. विश्वास हा पती-पत्नीच्या नात्याचा पाया असतो. याच पायावर संसाराचा गाड चालतो. पण काहीवेळा पतीच या विश्वासाला तडा देतो. असचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलय. ज्यात पतीने नात्यातील सर्व मर्यादा ओलांडल्या. यातून नवऱ्याची विकृती दिसून आली. एका नशेखोर पतीने आपल्या दोन मित्रांना पत्नीवर बलात्कार करायला लावला. आधी त्याने पैसे आणण्यासाठी म्हणून पत्नीला मित्रांसोबत पाठवलं. दोघेही तिला निर्जन स्थळी घेऊन गेले. तिथे त्यांनी विवाहितेवर सामूहिक बलात्कार केला. उत्तर प्रदेशच्या अमरोहामधील ही धक्कादायक घटना आहे.

पीडितेने जेव्हा याबद्दल पतीकडे येऊन तक्रार केली. तेव्हा उलट त्याने तिला गप्प राहण्याची धमकी दिली. ही घटना अमरोहाच्या जनपद नौगांवा क्षेत्रातील आहे. पीडित महिलेने हिम्मत दाखवली व तिने भावासोबत जाऊन पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी पती आणि त्याच्या दोन मित्रांना अटक केली आहे.

मी मागून बाईक घेऊन येतोय

आरोपी पतीने पत्नीला मित्रांसोबत जाऊन कोणाकडून तरी पैसे आणायला सांगितले. पत्नीने पतीच्या मित्रांसोबत जायला नकार दिला. तेव्हा त्याने सांगितलं, तू चिंता करु नको, मी मागून बाईक घेऊन येतोय. पत्नीला त्याने मित्रांसोबत पाठवून दिलं. त्याचवेळी पतीचे मित्र पीडित महिलेला निर्जन स्थळी घेऊन गेले. तिथे त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

एका आठवड्याने संयम सुटला

या घटनेबद्दल पीडित महिलेने आपल्या पतीला सांगितलं. त्यावेळी पतीने उलट तिला मित्रांविरोधात पोलीस कारवाई करु नकोस असं सांगितलं. पत्नीवर तोंड बंद ठेवण्यासाठी दबाव टाकला. कोणासमोरही ही गोष्ट बोलू नकोस अशी धमकी दिली. जेव्हा पीडित महिलेचा एका आठवड्याने संयम सुटला, तेव्हा तिने आपल्या भावाला सर्वकाही सांगून टाकलं.

नात्यावरचा विश्वास उडावा अशी ही घटना

महिलेचा भाऊ तिला पोलीस ठाण्यात घेऊन गेला. तिथे त्याने तक्रार दिली. पोलिसांनी पती आणि त्याच्या दोन मित्रांसह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. आता आरोपींना अटक करण्यात आलीय. पोलीस पुढील तपास करत आहेत. नवरा-बायकोच्या नात्यावरचा विश्वास उडावा अशी ही घटना आहे.