AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दमदार कथा अन् कलाकार असणारा तापसी पन्नूचा चित्रपट OTT वर रिलीज, कथा पाहून प्रेक्षक….

तापसी पन्नूचा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला चित्रपट आता प्रेक्षकांना OTT वर घरबसल्या पाहता येणार. या चित्रपटाची कथा एका महिलेच्या संघर्षाबाबत आहे.

दमदार कथा अन् कलाकार असणारा तापसी पन्नूचा चित्रपट OTT वर रिलीज, कथा पाहून प्रेक्षक....
Image Credit source: Social media
| Updated on: Apr 14, 2026 | 2:26 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिच्या ‘अस्सी’ या चित्रपटाची थिएटरनंतर आता ओटीटीवर रिलीज होण्याची प्रतीक्षा संपली आहे. सामाजिक विषयावर आधारित हा कोर्टरूम ड्रामा 20 फेब्रुवारी 2026 रोजी सिनेमागृहांत प्रदर्शित झाला होता. उत्कृष्ट कथा आणि प्रभावी मांडणीमुळे या चित्रपटाला समीक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. मात्र बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवण्यात तो अपयशी ठरला.

ज्या प्रेक्षकांनी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहू शकले नाहीत, त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांचा हा चित्रपट 17 एप्रिल 2026 पासून ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रेक्षक आता घरबसल्या हा चित्रपट पाहू शकतील. या चित्रपटाची कथा गौरव सोलंकी आणि अनुभव सिन्हा यांनी लिहिली असून, निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि अनुभव सिन्हा यांनी केली आहे.

बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘अस्सी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कामगिरी केली नाही. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाने भारतात एकूण सुमारे 10.47 कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले, तर जगभरात स्तरावर 14.93 कोटी रुपयांची कमाई केली. सुमारे 40 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाला आपले अर्धे बजेट देखील काढता आले नाही. त्यामुळे तो फ्लॉप ठरला.

‘अस्सी’ हा चित्रपट दिल्लीतील एका शाळेतील शिक्षिका परिमा हिच्या आयुष्यावर आधारित आहे. तिच्यावर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर ती न्यायासाठी झगडते. समाज आणि न्यायव्यवस्थेतील त्रुटींविरुद्ध लढणाऱ्या एका महिलेचा संघर्ष या चित्रपटात प्रभावीपणे दाखवण्यात आला आहे. या प्रकरणात तापसी पन्नूने साकारलेली वकील ‘रावी’ ही व्यक्तिरेखा न्याय मिळवण्यासाठी लढा देते.

चित्रपटात दमदार कलाकार

या चित्रपटात कानी कुसृति (परिमा), रेवती (वसुधा), मनोज पाहवा (दीपराज), कुमुद मिश्रा (कार्तिक), मोहम्मद जीशान अय्यूब (विनय) आणि सत्यजीत शर्मा (विरोधी वकील) अशा कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

जरी ‘अस्सी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला असला, तरी त्याची कथा आणि सामाजिक संदेश यामुळे तो प्रेक्षकांसाठी महत्त्वाचा ठरतो. आता ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाला नव्याने प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

Follow Us
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.
राजभवनात भाजपचे एजंट बसलेत; राऊतांचा भाजप आणि राज्यपालांवर हल्लाबोल
राजभवनात भाजपचे एजंट बसलेत; राऊतांचा भाजप आणि राज्यपालांवर हल्लाबोल.
निदा खान फक्त मोहरा, महाराष्ट्रभर मोठं जाळं कार्यरत?
निदा खान फक्त मोहरा, महाराष्ट्रभर मोठं जाळं कार्यरत?.
मोठी दुर्घटना टळली! वादळात अडकलं एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर.....
मोठी दुर्घटना टळली! वादळात अडकलं एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर......
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार.
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा...
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा....
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले...
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले....