Devendra Fadnavis । जरांगे पाटलांच्या उपोषणावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; काय म्हटलंय?
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले असून, आंदोलनस्थळी राजकीय हालचालींना वेग आला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, सरकार या प्रश्नावर सकारात्मक आहे आणि यापूर्वीही अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले असून, आंदोलनस्थळी राजकीय हालचालींना वेग आला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, सरकार या प्रश्नावर सकारात्मक आहे आणि यापूर्वीही अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. अडचणी आल्या त्या प्रत्येक वेळी निर्णय घेतले गेले असून सरकारची भूमिका पारदर्शक व सकारात्मक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
“आमचे सरकार सर्व समाजांसाठी काम करत आहे. समाजांना एकमेकांसमोर उभे करून भांडण लावणे आमचा हेतू नाही. सर्वांचे भले कसे होईल यावर आमचा प्रयत्न असतो,” असे फडणवीस म्हणाले. मराठा समाजासंदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, आतापर्यंत जे निर्णय घेण्यात आले ते ऐतिहासिक आहेत. मात्र हे निर्णय संविधान, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांच्या चौकटीतच घ्यावे लागतात. त्या चौकटीबाहेर जाऊन घेतलेले निर्णय टिकत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. “एका समाजातून काढून दुसऱ्याला देणे आम्ही कधीच केले नाही आणि करणारही नाही. ओबीसी समाजाने घाबरण्याचे कारण नाही, त्यांचेही समाधान केले जाईल,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
जीआर संदर्भातील चर्चा सुरू असल्याचे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, कोणताही निर्णय संविधान आणि न्यायालयाच्या चौकटीतच घेतला जाईल.
Published on: May 30, 2026 11:21 AM
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,

