AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीस साहेब तुम्ही दहा दुसरे… पण गुंड सांभाळायचे बंद करा, मनोज जरांगे यांचे मुंडेंवर गंभीर आरोप

आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी, या कुटुंबियांना संरक्षण दिले पाहिजे, सरकारी वकीलही या कुटुंबाला देण्यात यावे अशी मागणी त्यांनी यावेळी जरांगे यांनी केली. कुटुंबियांनी एसपी साहेबाला भेटून सगळ्या समस्या सांगितल्या पाहिजेत असेही ते म्हणाले. 

फडणवीस साहेब तुम्ही दहा दुसरे... पण गुंड सांभाळायचे बंद करा, मनोज जरांगे यांचे मुंडेंवर गंभीर आरोप
dhananjay munde and manoj jarange
| Updated on: Jul 17, 2026 | 11:01 PM
Share

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे जात ज्ञानेश्वर वाकडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.यावेळी त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची घेतली माहिती घेत राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. फडणवीस साहेब तुम्ही दहा दुसरे चांगले सांभाळा, पण गुंड सांभाळायचे बंद करा असा सल्लाही धनंजय मुंडे यांचे नाव घेत जरांगे पाटील यांनी दिला आहे.

परळी वाल्याचे गुंड मस्तावले आहेत आणि माजले आहेत. त्यांच्यामुळे वाकडे कुटुंबीयांचे एक लेकरू गेलं आहे. त्याला जीवाला मुकावं लागल आहे. तर दुसरे बेशुद्ध अवस्थेत आहे. त्याच्यावर लातूर येथे उपचार सुरू आहेत. धन्या ( एकेरी उल्लेख ) पदाचा दुरुपयोग करुन हत्या घडवून आणत आहे अशीही टीका जरांगे पाटील यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले की निरीक्षकाला समजत नाही का ? की आपण प्रशासनामध्ये आहोत. आरोपींची कसलीही कदर केली नाही पाहिजे.

ज्ञानेश्वर वाकडे यांचा खून झाला, दुसरा सुद्धा मेला पाहिजे. या उद्देशाने पाठीमागे साक्षीदार राहू नयेच ..हा तर उद्देश नव्हता ना त्या पीएसआयचा ? या परळीवाल्याचं ऐकून असा संशय येतो असेही जरांगे यांनी म्हटले आहे. एका बांधवाला हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी रात्रभर पीआय गाडीत घेऊन फिरतो. पीएसआय 100% दोषी आहे. त्यांनी काळजी घेतली असती तर खून पण झाला नसता. यांना दहा-पंधरा लोकांनी मारले आहे असाही आरोप जरांगे पाटील यांनी केली आहे.

पण हे गुंड सांभाळायचं बंद करा

फडणवीस साहेबाला एकच सांगायचे दहा चांगले सांभाळा, पण हे गुंड सांभाळायचं बंद करा. अजितदादाच्या पक्षाकडून धनंजय मुंडेला न्याय दिला जातो (एकेरी उल्लेख करत) परंतु तो तुमचा आशीर्वाद घेऊन खुन करतो. फडणवीस तुम्ही जाणीव ठेवा अजितदादाच्या पक्षाने पण जाणीव ठेवली पाहिजे, तो पदाचा दुरुपयोग खून करण्यात करतो. खून करण्यासाठी मंत्रीपद घेतात. बाकीचे मंत्री विकास करण्यासाठी मंत्रीपद घेतात. कुणी जीव घेण्यासाठी मंत्रीपद घेतो.

जर पोलीस प्रशासन परळीचा ऐकून तो खून असूनही अपघात दाखवत असतील आणि पीएम रिपोर्ट जर सांगत असेल हा खून आहे आणि तो पीआय म्हणत असेल की हा अपघात आहे. तर फडणवीस साहेब तुमची मान खाली घालण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करीत आहे. तुमचं नाव बदनाम होईल, असं परळीवाल्याचं ऐकून करत असेल तर अजितदादाच्या पक्षाला फडणवीस साहेबांनी बळ द्यायचं काम कमी करावे. लोक सहन करतील तोपर्यंत करतील, पण एकेदिवशी खूप मोठा उद्रेक होईल हे फडणवीस साहेबांनी समजून घ्यावं. पुढच्या काळात वाकडे कुटुंबीयांच्या जीवाला धोका आहे असेही जरांगे म्हणाले.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा