AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना मुनीर, ना पीएम, ना राष्ट्राध्यक्ष… पाकिस्तानात या व्यक्तीला सर्वाधिक वेतन

पाकिस्तान दीर्घकाळापासून महागाई, परकीय चलन साठ्याची कमतरता आणि आयएमएफ (IMF) कार्यक्रमासारख्या आर्थिक आव्हानांशी झुंजत आहे. अशा वेळी, सरकारी अधिकाऱ्यांच्या वेतनाबाबत अनेकदा सार्वजनिक चर्चा सुरू असते.

ना मुनीर, ना पीएम, ना राष्ट्राध्यक्ष… पाकिस्तानात या व्यक्तीला सर्वाधिक वेतन
pakistan highest salary person
| Updated on: Jul 18, 2026 | 5:52 AM
Share

पाकिस्तानची चर्चा नेहमी आर्थिक दिवाळखोर , IMF वरील कर्ज, सरकारी खर्चातील कपातीवरून चर्चेत असतो, अशा बेबंदशाहीत या देशाचे शीर्षस्थ नेतृत्व आणि सरकारी पदांना मिळणारे वेतनाचे आकडे आश्चर्यचकीत टाकणार आहेत. रेकॉर्डनुसार पाकिस्तानच्या पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष, जनरल यांच्याहून जास्त वेतन घेणाऱ्या व्यक्तीचा हुद्दा पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल…

पाकिस्तानच्या सैन्य दल प्रमुख जनरल असिम मुनीर आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याहून जादा वेतन असणारी पाकिस्तानची व्यक्ती कोण असा सवाल तुमच्या मनात असेल तर उत्तर धक्कादायक आहे. मात्र, पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचे निर्धारित वेतन या व्यक्तीहून जास्त असले तरी राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी देशाच्या आर्थिक स्थितीचा हवाला देत वेतन न घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता नियमित रुपाने सर्वाधिक वेतन घेणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यात या देशाच्या महालेखा पाल यांचे नावे सर्वात पुढे आहे.

पाकिस्तानचे सध्याचे महालेखापाल मकबूल अहमद गोंडल यांचे वार्षिक वेतन 97,68,240 पाकिस्तानी रुपये आहे. म्हणजे त्यांना दर महिन्याला 8.14 लाख रुपये (मुळ वेतन 7.72 लाख रुपये ) अन्य भत्ते मिळतात. हे वेतन पाकिस्तानचे सैन्य दल प्रमुख जनरल असिम मुनीर आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याहून जास्त आहे. महालेखापाल मकबूल अहमद गोंडल यांच्यावर पाकिस्तानच्या सरकारी खर्चाचे ऑडिट करण्याची आणि संसदेसमोर सादर करण्याची जबाबदारी असे घटनात्मक पद आहे. महालेखापाल यांचे कार्यालय पाकिस्तानातील सर्वात मोठे घटनात्मक कार्यालय म्हटले जाते.

महालेखापालांचे काम काय ?

महालेखापालाचे काम केवळ सरकारी खात्यांची तपासणी करण्याचे नाही. हे कार्यालय केंद्र सरकार, मंत्रालय, सरकारी कंपन्या आणि सार्वजनिक संस्थांचा खर्चाचे ऑडिट करते. याशिवाय टॅक्समधून जमणाऱ्या पैशांचा उपयोग नियमानुसार झाला की नाही याची छाननी महालेखापाल करतात. हा ऑडिट रिपोर्ट संसदेत सादर केला जातो. त्याआधारे सरकारी विभागांकडून उत्तर मागितले जाते.

पाकचे राष्ट्राध्यक्ष वेतन का घेत नाहीत?

मार्च २०२४ मध्ये, पाकचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी आपल्या कार्यकाळात वेतन घेणार नाही असे जाहीर केले. राष्ट्राध्यक्ष सचिवालयाने सांगितले की, देशासमोरील आर्थिक आव्हाने लक्षात घेता, त्यांनी सरकारी तिजोरीवर अतिरिक्त भार न टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक शिस्त आणि काटकसरीचा संदेश देण्यासाठी आपण हे पाऊल उचलले आहे असे त्यांनी म्हटले आहे.

आर्थिक संकटाच्या गर्तेत पाक

पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी वेतन न घेण्याच्या निर्णयानंतर आणि त्यानंतर महालेखापालांच्या उच्च वेतनाचा हा मुद्दा पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे. मात्र, महालेखापालांचा पगार घटनात्मक चौकट आणि सेवा नियमांनुसार निश्चित केला जातो आणि या स्वतंत्र घटनात्मक संस्थेची स्वायत्तता टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने तो दिला जातो असे म्हटले जाते.

Follow Us
कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा...
MLC Election Results 2026: कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा डंका; पाहा A टू Z
मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
Pradip Purnekar Case: मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी,
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी, सतीश चव्हाण पिछाडीवर
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या नेत्याचं विधान
राजकीय मतभेद बाजूला! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार?
राजकीय मतभेद बाजूला! CM फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण
NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी...
MLC Election Result 2026 Updates : NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी अपडेट समोर
पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच...
Breaking Updates : पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच... अमरावती मतदारसंघात मोठा उलटफेर
अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest...
Marathwada MLC Constituency Election 2026 : अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest अपडेट काय?
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, ST महामंडळ...
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकासमोर...